दुग्धशाळा
मानवी वापरासाठी बहुदा गाय किंवा म्हैस, परंतु बकरी, मेंढी, घोडी, किंवा ऊंट यांसह प्राण्यांचे दूध काढणे किंवा प्रक्रिया करणे (किंवा दोन्ही) साठी स्थापन केलेला दुग्धशाळा हा व्यवसाय उपक्रम आहे. दुग्धशाळा सामान्यतः समर्पित दुग्धशाळा क्षेत्रावर किंवा बहु-उद्देशीय शेती (मिश्र शेती)च्या विभागामध्ये असते जी दूध काढण्याशी संबंधित असते.
गुणधर्म म्हणून, दुग्धशाळा या शब्दाचा दुग्धजन्य उत्पादने, अनुजात आणि प्रक्रिया, आणि त्यांच्या निर्मितीमध्ये समाविष्ट प्राणी आणि कामगार असा संदर्भ घेतला जातो: उदाहरणार्थ दुग्धशाळा पशू, दुग्धशाळा बकरी. दुग्धशाळा क्षेत्र दूध निर्मिती करतात आणि विविध दुग्धशाळा उत्पादनांवर दुग्धशाळा कारखान्यात प्रक्रिया करतात. या संस्था जागतिक दुग्धशाळा उद्योगाचा म्हणजेच अन्नपदार्थ उद्योगाचा एक घटक आहेत.
औद्योगिक प्रक्रिया
संपादनदुग्धशाळा प्रकल्प शेतकऱ्यांकडून मिळालेल्या कच्च्या दुधावर त्याचे विक्रीयोग्य आयुष्य वाढण्यासाठी प्रक्रिया करतात. दोन मुख्य प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात: मानवी वापरास दूधाच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आणि त्याचा साठवणूक कालावधी वाढवण्यासाठी गरम करण्याचा उपचार, दुग्धशाळा उत्पादने निर्जलित करणे जसे की बटर, घट्ट चीज आणि दूध पावडर जेणेकरून ते साठवले जाऊ शकतात.
साय (क्रीम) आणि बटर
संपादनआजकाल, मोठ्या मशीनने दूध मोठ्या प्रमाणात साय आणि स्निग्धांश विरहीत दूध यांमध्ये वेगळे केले जाते. सायीची जाडी, स्वयंपाक वापरासाठी आणि ग्राहकांच्या मागणीनूसार तीची योग्यता याआधारे सायीवर विविध ग्राहक उत्पादने तयार करण्यासाठी प्रक्रिया केली जाते, जे ठिकाणांनूसार आणि देशानूसार वेगवेगळे असतात.
दही
संपादनदही तयार करण्याची प्रक्रिया ही चीज तयार करण्यासारखीच असते, केवळ दही फार घट्ट बनण्याआधी ती प्रक्रिया थांबवली जाते.
दूध पावडर
संपादनदूधावर पावडर तयार करण्यासाठी विविध वाळवण प्रक्रिया सुद्धा केल्या जातात. स्निग्धांशयुक्त दूध, स्निग्धांश विरहीत दूध, ताक, आणि मठ्ठा उत्पादने पावडर रूपात वाळवले जातात आणि मानवी आणि प्राणी वापरासाठी उपयोगात आणले जातात. मानवी किंवा प्राणी वापरासाठी निर्मीतीमधील मुख्य फरक हा आहे की प्रक्रिया आणि उत्पादन हे दूषितीकरणाच्या संरक्षणात असतात. बरेच लोक दूध पावडर पासून दूध बनवून पितात, कारण दूधामध्ये 88% पाणी असते आणि वाळवलेले उत्पादन परिवहन करणे सुद्धा स्वस्त असते. [१]
इतर दूध उत्पादने
संपादनमध्य आशियामध्ये व्यावसायिकरित्या कुमिस निर्मीती केली जाते.पारंपारिकरित्या ते घोडीच्या दूधापासून बनवले जात असले तरीही, आधुननिक उद्योगामध्ये त्यासाठी गायीच्या दूधाचा वापर केला जाऊ शकतो. भारतामध्ये, जो जागतिक दूध निर्मीतीपैकी 22% निर्मीती करतो (2018 प्रमाणे), पारंपारिक दुग्धजन्य उत्पादने व्यावसायिक तत्त्वावर निर्माण केले जातात. [ संदर्भ हवा ]
संदर्भ
संपादन- ^ "दूध पावडर". रिसर्चगेट.नेट.