दिशा पिंकी शेख
दिशा पिंकी शेख ( ७ मे १९८४) ह्या महाराष्ट्रातील तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या, कवयित्री आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या आहेत.[१] त्या वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्यासाठीच्या प्रवक्ते गटाच्या सदस्याही आहेत.[२] त्यांची ओळख सामाजिक चळवळीतील एक तृतीयपंथी कार्यकर्त्या आणि कवयित्री म्हणून असल्याचे त्या सांगतात.[३][४]
वैयक्तिक जीवन
संपादनमुळच्या नाशिक जवळच्या येवले येथील असलेल्या दिशा शेख यांचे शालेय शिक्षण दहावीपर्यंतच झाले आहे.[५] त्या पुस्तकविक्री, मंगती (हिजडा म्हणून भीक मागणे) इत्यादी करून उपजीविका करतात.[६] दिशा शेख ह्या बाबासाहेब आंबेडकर यांना आपले मुख्य आदर्श मानतात. "बाबासाहेबांमुळे आम्हाला [तृतीयपंथीयांना] व्यक्ती म्हणून मान्यता मिळाली" असे त्या सांगतात.[४]
राजकीय कारकीर्द
संपादनदिशा शेख ह्या भारिप बहुजन महासंघ या राजकीय पक्षाशी संलग्न असून फेब्रुवारी २०१९ मध्ये जाहीर झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्ते गटामध्ये त्यांचा सहभाग केला आहे.[७] राजकीय पक्षाच्या प्रवक्ते पदी निवड होणाऱ्या त्या महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी आहेत.[८]
या पदाची जबाबदारी स्वीकारताना त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच राजकीय जबाबदारी स्वीकारत असल्याने दडपण आल्याचे नोंदवले आहे. त्याचबरोबर लैंगिक अल्पसंख्याकांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.[५] लैंगिक अल्पसंख्याकांचा आवाज संसदेत पोहोचवणे ही जबाबदारी स्वीकारण्याचा हेतू आहे असे त्यांनी मत व्यक्त केले.[९] सर्व वंचितांच्या प्रश्नांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याचेही त्यांनी नोंदवले आहे.[१०]
संदर्भ
संपादन- ^ "आम्ही प्रथमपंथीय का नाही? तृतीयपंथी विचारवंत दिशा शेख | पुढारी". www.pudhari.news. 2019-03-03 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "खासदार निवडून आणून कॉंग्रेसशी बोलणी - ॲड. आंबेडकर". www.esakal.com. 2019-03-03 रोजी पाहिले.
- ^ "vanchit bahujan aaghadi: तृतीयपंथी दिशा वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्ते पदी". Maharashtra Times. 2019-02-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-03-03 रोजी पाहिले.
- ^ a b "#आंबेडकरआणिमी : 'बाबासाहेबांमुळे आम्हाला व्यक्ती म्हणून मान्यता मिळाली!' - दिशा शेख" (इंग्रजी भाषेत). 2018-04-12. 2019-03-03 रोजी पाहिले.
- ^ a b "Transgender appointed as state spokesperson of Vanchit Bahujan Aghadi". https://www.hindustantimes.com/ (इंग्रजी भाषेत). 2019-03-03 रोजी पाहिले. External link in
|संकेतस्थळ=
(सहाय्य) - ^ "Transgender bookseller at Dadar makes a statement". dna (इंग्रजी भाषेत). 2019-03-03 रोजी पाहिले.
- ^ "Transgender becomes spokesperson for Ambedkar's VBA". The New Indian Express. 2019-03-03 रोजी पाहिले.
- ^ "vanchit bahujan aaghadi: तृतीयपंथी दिशा वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्ते पदी". Maharashtra Times. 2022-01-27 रोजी पाहिले.
- ^ "महाराष्ट्रात पहिल्यांदाच राजकीय पक्षाच्या प्रवक्तेपदी तृतीयपंथी". www.esakal.com. 2019-03-03 रोजी पाहिले.
- ^ "'मोदी विकणार चहा अन् अमित शहा वडे!'". Maharashtra Times. 2019-02-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-03-03 रोजी पाहिले.