दिव्या काकरान (जन्म 8 ऑक्टोबर 1998 ) ही एक भारतीय फ्रीस्टाईल कुस्तीपटू म्हणून ओळखली जाते. २०२० साली आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये ६८ किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकणारी ती देशातील पहिली महिला आहे.

दिव्या काकरान
वैयक्तिक माहिती
Citizenship भारतीय
जन्म ८ ऑक्टोबर १९९८ (
पूर्बलियान गाव, जिल्हा मुझफ्फरनगर, उत्तर प्रदेश
Education शारीरिक शिक्षण व क्रीडा विज्ञान पदवीची विद्यार्थिनी
Sport
खेळ कुस्ती
Coached by विक्रम कुमार सोनकर

२०१७ राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले आणि २०१८ मध्ये आशियाई खेळ व राष्ट्रकुल खेळामध्ये देशासाठी कांस्यपदकही जिंकले आहे. [1] उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिला २०२०मध्ये देशाच्या प्रतिष्ठित अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले.

नोएडा कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनमधील शारीरिक शिक्षण व क्रीडा विज्ञान पदवीची विद्यार्थी असलेली दिव्या ही भारतीय रेल्वेमध्ये वरिष्ठ तिकीट परिक्षक म्हणून कार्यरत आहे. [2]

वैयक्तिक आयुष्य आणि पार्श्वभूमी संपादन

दिव्या काकरानचा जन्म उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील पूर्बलियान गावात झाला.  तिचे वडील आहेत कुस्तीपटू सूरजवीर सैन आणि आई संयोगिता. घरच्या परिस्थितीमुळे सूरजवीर हे स्वतः गावपातळीपर्यंतच खेळू शकले, त्यापलीकडे नाही. त्यामुळेच त्यांनी आपल्या मुलांना अव्वल कुस्तीपटू बनवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली. [1]

लहानपणी दिव्या तिच्या वडिलांसोबत गावातील आखाड्यात जात असे, तिथे तिचा मोठा भाऊ देव प्रशिक्षण घेत होता. गावातल्या सोयी-सुविधांचा अभाव बघता सैन यांनी पुढे चालून आपले तळ दिल्लीला हलवले. त्यामागचे आणखी एक कारण म्हणजे कुस्ती हा केवळ पुरुषांसाठी हा एक खेळ आहे, हा  गावखेड्यांमधला समाज त्यांच्या मुलीसाठी अडथळा ठरू नये, असे त्यांना वाटत होते. (1)

मात्र दिल्लीतही मुलीना या खेळाचे प्रशिक्षण देण्याच्या कल्पनेला विरोध होताच, त्यामुळे दिव्याचे प्रशिक्षक अजय गोस्वामी यांना तेथील कुस्तीपटू व इतर प्रशिक्षकांना आधी राजी करावे लागले. कमी वयातच तिने दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील ग्रामीण भागात कुस्ती स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. तिथे तिचे विरोधक मुले असत, कारण तिच्याविरुद्ध स्पर्धा करण्यासाठी मुली नव्हत्या. वयाच्या १२व्या वर्षी २०१०मध्ये दिव्याने एका मुलाचा पराभव केला. [1][3]

हे सर्व करताना तिच्या कुटुंबाला बरीच आर्थिक  तडजोड करावी लागली. कुस्ती स्पर्धांमध्ये सूरज सैन हे त्यांच्या पत्नी संयोगिता यांनी शिवून तयार केलेले लंगोट विकत असत. एकदा राष्ट्रीय खेळांमध्ये भाग घेण्यासाठी दिव्याला एक लाख रुपयांची आवश्यकता होती, तेव्हा दिव्याच्या आईला तिचे दागिने गहाण ठेवावे लागले होते. दिव्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, ती १५ रुपयाला मिळणारे ग्लूकोजचे पाणी पिऊन स्पर्धांमध्ये भाग घ्यायला जायची. या गौप्यस्फोटानंतर तिला अनेक लोकांनी मदत देऊ केली. [3]

२२ वर्षांच्या दिव्याला तिच्या भावाने तिच्यासाठी केलेल्या त्यागाची जाणीव आहे. देव याने तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याचे शिक्षण आणि प्रशिक्षण दोन्ही मागे ठेवले. आजही तो तिला प्रशिक्षणात मदत करतो आणि तिच्याबरोबर इतर शहरांतील प्रशिक्षण शिबिरांमध्ये देखील जातो. [4]

दिव्या विविध विषयांवर आपले मत अगदी धाडसाने मांडते. मग तो सामाजिक विषमतेचा मुद्दा असो वा सरकारला मदतीची मागणी करण्याचा. एकदा एका वरच्या जातीच्या कुस्तीपटूला दिव्याने पराभूत त्या कुस्तीपटूवर जातीवाचक टिप्पणी करण्यात आली होती, तेव्हा दिव्या बोलली होती. याशिवाय एकदा तिने थेट मुख्यमंत्र्यांनाही असे सांगितले होते की गरीब प्रशिक्षणार्थींना गरजेच्या वेळी सरकारची मदत मिळत नाही. [5]

२९ नोव्हेंबर मध्ये दिव्याची कोरोना टेस्ट पॉजिटिव्ह आली होती. [6]

कारकीर्द संपादन

२०११ साली, हरियाणामध्ये झालेल्या स्कूल नॅशनल गेम्स स्पर्धेत दिव्याने कांस्य पदक पटकावले. हे तिचे पहिले पदक. त्यानंतर तिने गुरू प्रेमनाथ आखाड्यात विक्रम कुमार यांच्या प्रशिक्षणात तिचा खेळ आणखी सुधारला.

२०१३ मध्ये दिव्याने मंगोलियामध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रथमच भारताकडून खेळताना रौप्यपदक जिंकले. [1]

२०१७ मध्ये दिव्याने राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्ण आणि आशियाई कुस्ती स्पर्धेत रौप्य पदके पटकावली. याशिवाय राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तसेच अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धांमध्ये तिने सुवर्ण पदके जिंकली. [1]

२०१८ आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल खेळांमध्ये दिव्या कांस्य पदक विजेती ठरली. [8]

२०२० मध्ये आशियाई कुस्ती स्पर्धेत ६८ किलो वजनी गटात ती सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. [1]

पुरस्कार संपादन

तिच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी भारत सरकारने तिला २०२० मध्ये अर्जुन पुरस्कारने सन्मानित केले.

वर्ष स्पर्धा वजन पदक
२०२० अशियाई कुस्ती स्पर्धा ६८ किलो सुवर्ण पदक
२०१८ राष्ट्रकुल खेळ ६८ किलो कांस्य पदक
२०१८ आशियाई गेम्स ६८ किलो कांस्य पदक
२०१७ राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धा ६८ किलो सुवर्ण पदक
२०१७ वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा ६८ किलो सुवर्ण पदक
२०१७ अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धा ६८ किलो सुवर्ण पदक
२०१७ आशियाई कुस्ती स्पर्धा ६८ किलो रौप्य पदक