दिनेश सिंग
भारतीय राजकारणी
दिनेश सिंग (जुलै १९, इ.स. १९२५-नोव्हेंबर ३०, इ.स. १९९५) हे काँग्रेस पक्षाचे नेते आणि इ.स. १९६९ ते इ.स. १९७० आणि इ.स. १९९३ ते इ.स. १९९४ या काळात भारताचे परराष्ट्रमंत्री होते. ते इ.स. १९५७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील बांदा लोकसभा मतदारसंघातून, इ.स. १९६२ मध्ये तत्कालीन सलौन लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. १९६७,इ.स. १९७१,इ.स. १९८४ आणि इ.स. १९८९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये प्रतापगड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते राज्यसभेचेही सदस्य होते.