दिनकर वासुदेव दिवेकर
दिनकर वासुदेव दिवेकर (१८९८ - १९५७) हे मराठी ललित लेखक होते. ते आद्य व्यक्तिचित्रणकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी लिहिलेले व १९२८ साली प्रसिद्ध झालेले मोतीलाल नेहरूंचे व्यक्तिचित्रण हे मराठीतले पहिले व्यक्तिचित्रण समजले जाते.
दिवेकरांनी ए.जी. गार्डिनरपासून स्फूर्ती घेऊन व्यक्तिचित्रे लिहायाला सुरुवात केली.
दिवेकरांनी लिहिलेली व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकेसंपादन करा
- अविस्मरणीय व्यक्तिचित्रे (१९६०) : या संग्रहात ११ व्यक्तिचित्रे आहेत, त्यांपैकी एकही माणूस प्रसिद्ध नाही. कोणत्या बाह्य दर्शनाशिवाय या व्यक्तीची केवळ सूक्ष्म आणि सविस्तर स्वभाववर्णने रंगवली आहेत. ह्या पुस्तकातील महत्त्वाच्या लेखांची नावे अशी : अहो गंगामाई, आमचा नाना बामण, भाऊदास, याचे नाव डाॅक्टर, सुर्वता मावशी, इत्यपि. .
- स्वभावचित्रे (१९३४) : या संग्रहात सन १९२७पासूनचे लिखाण समाविष्ट आहे. यातली बरीचशी व्यक्तिचित्रे 'रत्नाकर' मासिकातून प्रकाशित होऊन लोकप्रिय झाली होती. राजकीय व्यक्तींपैकी कृ.प्र. खाडिलकर, जवाहरलाल नेहरू, न.चिं. केळकर, महात्मा गांधी, माधव श्रीहरी अणे, मुकुंदराव जयकर, मोतीलाल नेहरू, लोकमान्य टिळक, वल्लभभाई पटेल, विठ्ठलभाई पटेल, शि.म. परांजपे, सुभाषचंद्र बोस ह्या बारा व्यक्तींची चित्रे या पुस्तकात आहेत.
त्यांची अन्य पुस्तकेसंपादन करा
- आजचा रशिया (अनुवाद, १९३२)
- राष्ट्रीय शिक्षण (१९३२)