दालदी बोली
रत्नागिरी खाडीपट्यात मुस्लिम मच्छिमार लोक 'दालदी बोली' ही मराठी प्रमाणभाषेची बोली बोलतात. ते लोक याला 'दालदी कोकणी बोली' असे संबोधतात. या समाजाचा मुख्य व्यवसाय मच्छिमारी आहे त्यामुळे सागर व मासेमारी याविषयी कित्येक शब्दांचा भरणा त्यांच्या बोलीत आहे. उदा. "भागातचो मासोनी शेपटी कुसो" ही म्हण. याचा अर्थ भागीदारीत नीट लक्ष नसले की नुकसानच पदरी येते.