दापोली (महाड)

(दापोली गाव या पानावरून पुनर्निर्देशित)

दापोली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक गाव आहे.

  ?दापोली

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर महाड
जिल्हा रायगड जिल्हा
लोकसंख्या
घनता
३०० (२०११)
• २००/किमी
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

किल्ले लिंगाण्याच्या पायथ्याशी असलेले हे गाव किल्ले रायगड पासून ८-९ किलोमीटर अंतरावर आहे.

'दापोली' हे गाव तीन भागात विभागले गेले आहे. कदम आवाड, मोरे आवाड (पाटील आवाड), दापोली पाडा, आणि आदिवासी वाडी.

भौगोलिक स्थान संपादन

हवामान संपादन

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.

लोकजीवन संपादन

गावामध्ये २५०-३०० घरे आहेत. आदिवासी वाडी मुख्य गावापासून ३००-४०० मीटर अंतरावर आहे. गावातील काही घरे नदीच्या पलीकडे असल्यामुळे त्या वस्तीला दापोली पाडा असे म्हटले जाते. नदी पार करून दापोली पाड्याला जाण्यासाठी प्रशस्त असा पूल आहे.

गावामध्ये आठवी इयत्तेपर्यंतपर्यंत शिक्षणाची सोय आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना ६ किलो मीटर अंतर पार करून जावे लागते. गावातील बहुतांश लोक सुरत, मुंबई, पुणे, या ठिकाणी नोकरी व्यवसाया निमित्त स्तलांतरीत झालेली आहेत. प्रामुख्याने भात शेती हे पीक घेतले जाते. दरवर्षी होणाऱ्या गाव पांढरीची जत्रा ही होळी लागल्यावर 3-4 दिवसाने केली जाते होळीच्या दिवसा पासून ते जत्रा होई पर्यंत प्रत्येक घरातील एक तरी पुरुष हा होळीच्या माळावर झोपण्यासाठी येतो ही या गावाची वर्षांपासून चालत आलेली परंपराच आहे.

वैशिष्ट्ये संपादन

  • शिवाजी महाराजांच्या काळातील एक शंकराचे देऊळ.
  • जिल्हा परिषद शाळा (स्थापना सन १९३६)
  • किल्ले लिंगाणाच्या पायथ्याशी असलेले गाव
  • महाड तालुक्यातील प्रख्यात असलेले आई वरदानी मातेचे मंदिर या गावामध्ये आहे
  • महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार प्राप्त असलेले गाव
  • तलाठी कार्यालय (सजा दापोली, पंंदेेरी, पाने, वारंगी)
  • पोस्ट ऑफिस (दापोली, पंदेरी)

बिरवाड़ी मार्केट संपादन

दापोली गावातील नागरिकांसाठी बिरवाड़ी ही मुख्य बाजारपेठ आहे. बिरवाड़ीला जाण्यासाठी दापोलीतील नागरिकांना १९ किलोमीटरचा प्रवास करून जावे लागले. ही बाजारपेठ दापोली गावासोबतच इतर गावांचीसुद्धा मुख्य बाजारपेठ आहे. महाड बाजारपेठ ३२ किलोमीटर दूर अंतरावर असल्यामुळे बिरवाड़ी बाजारपेठेत लोकांच येणेजाणे जास्त प्रमाणात असते.

प्रेक्षणीय स्थळे संपादन

नागरी सुविधा संपादन

जवळपासची गावे संपादन

संदर्भ संपादन

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/