दशेरी आंबा
महाराष्ट्रात दशेरी व उत्तर भारतात दशहरी नावाने ओळखल्या जाणाऱ्या या आंब्याची चव इतर जातीच्या आब्यापेक्षा खूपच जास्त गोड असते म्हणून हा जास्त प्रमाणात खाता येत नाही. उत्तर भारतातील अतिशय प्रसिद्ध अशी जात आहे. हा आंबा लांबट आकाराचा असतो साधारणपणे एक वर्षाआड फलधारणा असते.हा आंबा इतर आब्यापेक्षा लवकरच पिकतो आणि याची फळे इतरांच्या तुलनेत टिकाऊ असतात.