दलित विमेन स्पीक आउट: कास्ट, क्लास अँड जेंडर व्हायोलन्स इन इंडिया

दलित विमेन स्पीक आउट: कास्ट, क्लास अँड जेंडर व्हायोलन्स इन इंडिया हे पुस्तक जयश्री मंगुभाई आणि इतर लेखकांनी लिहलेलले आहे.[१]

दलित स्त्रियांवर होत असलेल्या / चाललेल्या जात-वर्ग-लिंग भेदभाव आणि हिंसाचाराच्या दृष्टीने कठोरपणे बेताल सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सत्ता यांची समीकरणे व त्याचा परिणामांचे विश्लेषण हे अनुभवांच्या माध्यमातून मांडताना त्यातील क्लिष्टता विश्लेषणात्मकरित्या मांडली आहे.

प्रस्तावना संपादन

दलित स्त्रियांवर सातत्याने होत असलेले अत्याचार हे सरळसोट पणे होणारे नाहीत.त्यामागील जात, वर्ग, आणि लिंगभाव यातील विषमता यांची पाळेमुळे खोलवर असलेली दिसून येतात. सदर पुस्तकात दलित[२] स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचार व हिंसाचाराविषयीचे अभ्यासात्मक विश्लेषण केले आहे. लिंगभाव, जात समानतेचा अधिकार भारतात मूलभूत अधिकारांमध्ये आहे, असे असले तरी त्याची पायमल्ली सातत्याने होताना दिसते.अगतिकतेसकट भारताच्या लिंग, जात आणि वर्ग पदानुक्रमाच्या तळाशी असलेली जातीय, वर्गीय मानसिकता आणि व्यवस्था यात दिसून येते.दलित स्त्रियांवर होत असलेल्या / चाललेल्या जात-वर्ग-लिंग भेदभाव आणि हिंसाचाराच्या दृष्टीने कठोरपणे बेताल सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सत्ता यांची समीकरणे व त्याचा परिणामांचे विश्लेषण हे अनुभवांच्या माध्यमातून मांडताना त्यातील क्लिष्टता विश्लेषणात्मकरित्या मांडली आहे. तसेच प्रस्तुत पुस्तकात चार राज्यांमधील एकूण पाचशे दलित स्त्रियांच्या स्वकथणातून आणि मुलाखतीच्या माध्यमातून त्यांच्यावर होणाऱ्याध हिंसाचार, अत्याचाराची क्लिष्टता आधिक विश्लेषणात्मकरित्या मांडली आहे. याबरोबरच काही कथा,उतारे आणि नमून्यांचीनिवड पद्धतीने मांडणी केल्याने त्यातील स्पष्टता लक्षात येते.

ठळक मुद्दे संपादन

1.जात,वर्ग आणि लिंगभावामुळे होणारे हिंसाचार 2.दलित स्त्रियांवरील हिंसाचाराचे पद्धतशीरपणे नैसर्गिकीकरण 3.सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये असलेली जबरदस्त विषमता 4.दलित स्त्रियांवर होणारा हिंसाचार हा एकसाचेबद्ध नसुन त्याचे विविध आयाम लक्षात घेणे आवश्यक आहे. सदरच्या पुस्तकात प्रकरण 4 आणि 13 मध्ये दलित स्त्रियांवर होणाऱ्या हिंसाचाराविषयीचे अभ्यासात्मक विश्लेषण केले आहे, तसेच प्रकरण 14 मध्ये दलित स्त्रियांवरील हिंसाचाराचे पद्धतशीरपणे नैसर्गिकीकरण कसे केले जाते याची सविस्तर मांडणी केली आहे.यातील सर्व प्रकरणे एकमेकांशी जोडलेली आहेत, त्यामुळे एकूणच पुस्तकात जात,वर्ग आणि लिंगभावामुळे होणारे हिंसाचार आणि अत्याचार हे लोकांच्या मानसिकतेतून होतातच परंतु जातव्यवस्था, वर्गव्यवस्था आणि लिंगभावाला करणीभूत असलेली पितृसत्तात्मक[३]व्यवस्था इ. मुळे होतात हे वाचकांच्या लक्ष्यात येते. सदरील अभ्यास हा स्त्रियांच्या/ दलित स्त्रियांच्या मानवी हक्क पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक जीवन किंवा खाजगी जीवनातील हिंसा, अत्याचार असो त्याच्या निर्मूलनासाठी संयुक्त रूपाने एकत्र येऊन जात-वर्ग लिंगभाव आणि हिंसा निर्मूलनासाठी,एक चिकिस्तक दृष्टीकोण अभ्यासकांसमोर ठेवतात, व प्रशासनाणे देखील व्यापक प्रतिबंधात्मक आणि शिक्षात्मक उपाय अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.दलित स्त्रीवादी[४] अभ्यासक यांनी सदर पुस्तकाचा लिंगभावात्मक दृष्टीकोणातून पहिले आहे. यामुळे विविध अभ्यासक,कार्यकर्ते,वाचक इत्यादिसाठी प्रस्तुत पुस्तक महत्त्वाचे असे आहे. कुठल्याही जातींच्या वस्त्यांमध्ये दलित स्त्रियांच्या परिस्थितीवर नजर टाकल्यास जात, वर्ग आणि लिंगभावानुसार उतरंडीच्या तळाशी असलेल्या दलित स्त्रियांची हलाखी/ परिस्थिति लक्षात येते. जात, वर्ग आणि लिंगभावावर आधारित विषमता आणि हिंसाचाराच्या रोगाची लागलेली लागण स्त्रिया भोगत असतात. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये असलेली जबरदस्त विषमता(प्रछन्न)हे या रोगाचे मूळ कारण आहे. त्याचबरोबर जातीव्यवस्थेच्या स्तररचनेमद्धे एकूणच समाजरचनेच्या उतरंडीमद्धे ज्या प्रकारची अस्पृश्यता पाळली जाते त्याचाही परिणाम दलित स्त्रियांबरोबरच एकूणच स्त्रियांवर होताना दिसतो. परंतु प्रस्तुत पुस्तकात दलित स्त्रियांवर होणारा हिंसाचार हा एकसाचेबद्ध नसुन त्याचे विविध आयाम लक्षात घेणे आवश्यक आहे हे अभ्यासक,वाचक,चळवळीतील कार्यकर्ते आणि एकूणच समाजव्यवस्था इत्यादींचे लक्ष वेधून घेतात. दलित स्त्रियांना एफआयआर नोंदणी करताना अनेक अडचनिंना सामोरे जावे लागते,त्यामध्ये मुख्यत:ती स्त्री आहे म्हणुन आणि ती दलित स्त्री आहे म्हणुन देखील पीडित स्त्रीची तक्रार नोंदणी करवून घेण्यास संबंधित शासकीय अधिकारी टाळाटाळ करतात.त्यामुळे असलेल्या कायद्यांमद्धे सुधारणा व्हावी तसेच न्यायालयीन कामकाज त्वरित केले जावे यासाठी अनेक स्वायत्त संघटना व अभ्यासक काम करत आहे. यामध्ये स्त्रीवादी अभ्यासक यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावत आहे. विविध अभ्यासकांनी दलित स्त्रियांवर व दलित स्त्रीवादावर अभ्यास केले आहेत त्यापैकी शर्मिला रेगे[५][६] आणि गोपाळ गुरू[७] DALIT WOMEN TALK DIFFERENTLY: A CRITIQUE OF DIFFERENCE AND TOWARDS A DALIT FEMINIST STANDPOINT POSITION. यांनी दलित स्त्रिया ह्या वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात.शर्मिला रेगे या आपल्या www.academia.edu/8467140/Dalit_Women_Talk_Differently या लेखात ते चिकिस्तकरित्या मांडतात.दलित स्त्रियांच्या स्वकथणाच्या अंनुभावातून अतिशय प्रभावीपणे अनेकविध पदर व त्यांची मांडणी प्रस्तुत पुस्तकाच्या लेखकांनी केलेली दिसते. दलित स्त्रियांना ग्रहीत धरण्याचे राजकारण हये सातत्याने होताना दिसते. जातीय भेदभावमुळे स्त्रियांवरील अत्याचारमुळे, हिंसाचारमुळे अत्याचार करणारे इथे प्रस्थापित सत्तेचा वापर करताना दिसतात. त्यामुळे दलित वस्त्त्यावर होणारा अत्याचार हा कमी होण्याऐवजी तो वाढताना दिसतो

प्रतिसाद /योगदान संपादन

१. “A remarkable feature of this study is its attempt to evolve a taxonomy of violence….[T]he manner in which Dalit women work to preserve a sense of the self in the midst of all works against such an effort is moving and humbling.” (V. Geetha, The Hindu) About the Author २॰Aloysius Irudayam S. J. is program director of the Research, Advocacy, and Human Rights Education Department at the Institute of Development Education, Action and Studies in Tamil Nadu. Jayshree P. Mangubhai is currently a senior program officer with Christian Aid in India. Joel G. Lee was a researcher at the Indian Institute of Dalit Studies and is now a graduate student at Columbia University.

महत्त्वाच्या संकल्पना संपादन

जातीव्यवस्था,पितृसत्ता,लिंगभाव,दलित,प्रस्थापित,सत्ता,दलित स्त्रीवाद,दलित अत्याचार. 

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ Aloysius Irudayam, Joel G. Lee, Jayshree P. Mangubhai. Dalit_Women_Speak_Out. २८ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ www.ncdhr.org.in/dalits-untouchability/
  3. ^ opac.tiss.edu/cgi-bin/koha/opac-detail.pl?biblionumber=264315
  4. ^ www.academia.edu/.../Understanding_Dalit_Feminism
  5. ^ www.jstor.org/stable/4407323 Similar
  6. ^ www.sagepub.in/books/Book226086
  7. ^ www.jnu.ac.in/Faculty/gguru/ Jawaharlal Nehru University, Delhi