दर्शन गंडस उर्फ दर्शन कुमार हा एक हिंदी चित्रपट अभिनेता तसेच हिंदी दूरचित्रवाणी अभिनेता आहे, जो प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये दिसतो. त्याने मेरी कोम या चित्रपटातून भारतीय चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात त्याने प्रियांका चोप्रा सोबत प्रमुख भूमिका निभावली होती.[१][२] इस. २००३ मध्ये सलमान खान अभिनित चित्रपट तेरे नाम मध्ये देखील तो राधेच्या मित्रांपैकी एक म्हणून दिसला होता.

दर्शन कुमार
दर्शन गंडस
जन्म १ सप्टेंबर, १९८६ (1986-09-01) (वय: ३७)
दक्षिण दिल्ली
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २००३ पासून ते आजतागायत
भाषा हिंदी
प्रमुख चित्रपट मेरी कोम
द काश्मीर फाइल्स

वैयक्तिक आयुष्य संपादन

कुमारचा जन्म दक्षिण दिल्लीतील किशनगड गावातील जाट हिंदू कुटुंबात झाला आहे.[३] वयाच्या २४ व्या वर्षी कुमार मुंबईला गेले आणि तेथे त्यांनी पाच वर्षे 'सहज थिएटर ग्रुप'मध्ये काम केले.[४][५]

अभिनयाची कारकीर्द संपादन

मेरी कोम चित्रपटाच्या कास्टिंग डायरेक्टरने कुमारला 'मेरी कोम' या चित्रपटासाठी ऑडिशन देण्यास सांगितले. जिथे कुमार यांनी या चित्रपटासाठी निवड देखील झाली. कुमार यांनी 'देवों के देव...महादेव' या दूरचित्रवाणी मालिकेत देखील काम केले होते. या मालिकेत कुमार यांनी राक्षसाचे गुरू शुक्राचार्य यांची भूमिका पार पाडली होती.[६][७] कुमारचा पहिला चित्रपट अनुष्का शर्मा अभिनित 'NH10 होता, परंतु 'मेरी कोम' हा चित्रपट प्रथम प्रदर्शित झाला होता.[८][९]

चित्रदालन संपादन

अभिनय संचिका संपादन

दूरचित्रवाणी संपादन

वर्ष मालिका भूमिका संदर्भ
2008–2010 छोटी बहू पुरब
2010–2012 बाबा ऐसो वीर ढुंडो मृदंग लाल
2011–2014 देवो के देव... महादेव शुक्राचार्य [१०]
2012 हवन

चित्रपट संपादन

वर्षे चित्रपट भूमिका नोंदी
2001 मुझे कुछ केहना है नायकाचा मित्र
2003 तेरे नाम कनक शर्मा
2014 मेरी कोम ऑनलर कोम [११]
2015 NH10 सतबीर नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी प्रोड्यूसर्स गिल्ड फिल्म पुरस्कार

आय आय एफ ए सर्वश्रेष्ठ खलनायक पुरस्कार विजेता[१२]

2016 सरबजीत अवैस शेख
2017 मिर्झा ज्युलियेट मिर्झा
अ जेंटलमन याकूब साबरी
2018 बागी २ शेखर साळगावकर
2019 पी. एम. नरेंद्र मोदी रिपोर्टर
2021 तुफान धर्मेश पाटील अमेझॉन प्राईम चित्रपट
विशेष अतिथी[१३]
2022 द काश्मीर फाइल्स कृष्णा पंडित निर्वासित काश्मिरी पंडित

वेब सिरीज संपादन

वर्ष मालिका भूमिका स्थळ संदर्भ
2019 परछाई लिओ झी फाईव्ह [१४]
2019- 2021 द फॅमिली मॅन मेजर समीर ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ [१५]
2020 अवरोध मेजर रौनक गौतम सोनी लिव्ह [१६]
आश्रम एस आय उजागर सिंग एम एक्स प्लेयर

संदर्भ संपादन

  1. ^ "Does Darshan Kumar Look Like Johnny Depp?". Indian Express. IndiaWest.Com. 16 October 2014. Archived from the original on 2015-01-27. 10 December 2014 रोजी पाहिले.CS1 maint: others (link)
  2. ^ "Darshan Kumar: Won't be overshadowed by Priyanka Chopra in 'Mary Kom'". IBN Live. 17 August 2014. Archived from the original on 21 August 2014. 10 December 2014 रोजी पाहिले.
  3. ^ "Darshan Kumar says he is the hero of 'Mary Kom'". India Insight. Reuters Blog. 4 September 2014. Archived from the original on 5 September 2014. 9 March 2022 रोजी पाहिले.
  4. ^ "Darshan Kumar's on-screen dreams". The Hindu. 8 September 2014. 10 December 2014 रोजी पाहिले.
  5. ^ "Meet Priyanka Chopra's screen husband from 'Mary Kom' — Darshan Kumar". DNA India. 8 September 2014. 10 December 2014 रोजी पाहिले.
  6. ^ "Meet Mary Kom's reel husband". The Hindu. 7 August 2014. 10 December 2014 रोजी पाहिले.
  7. ^ "'Mary Kom' Debut is Dream Come True: Darshan Kumar". IndiaWest.com. 12 August 2014. Archived from the original on 31 May 2019. 10 December 2014 रोजी पाहिले.
  8. ^ "After Priyanka, Darshan Kumar plays Anushka's love interest!". The Free Press Journal. 14 ऑगस्ट 2014. Archived from the original on 22 July 2015. 10 December 2014 रोजी पाहिले.
  9. ^ "'Mary Kom' actor Darshan Kumar plays Anushka Sharma's love interest in 'NH10′". Indian Express. 13 August 2014. 10 December 2014 रोजी पाहिले.
  10. ^ "Devon Ke Dev Mahadev at Star TV". Archived from the original on 2014-10-08. 2022-03-16 रोजी पाहिले.
  11. ^ "'Mary Kom' star Darshan Kumar seen as the 'ideal' husband, says it feels good". IBN Live. 23 September 2014. Archived from the original on 24 September 2014. 10 December 2014 रोजी पाहिले.
  12. ^ "Darshan Kumar plays a grey character in NH10". Indian Express. 5 December 2014. 10 December 2014 रोजी पाहिले.
  13. ^ "Darshan Kumaar joins 'Toofan' as antagonist". dailyexcelsior. 16 September 2019. 16 September 2019 रोजी पाहिले.
  14. ^ "Darshan Kumaar Roped In For ZEE5 Original Web Series Parchhayee". Zee Tv (इंग्रजी भाषेत). 2019-06-04. Archived from the original on 2019-10-02. 2019-10-02 रोजी पाहिले.
  15. ^ "The Family Man Cast: Who plays whom in Manoj Bajpayee's upcoming Amazon Prime original series". GQ India (इंग्रजी भाषेत). 2019-09-11. 2019-12-06 रोजी पाहिले.
  16. ^ "Avrodh the Siege Within". imdb (इंग्रजी भाषेत). 2020-06-23. 2020-06-23 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन