दत्तू भोकनळ

भारतीय रोइंगपटू

दत्तू बबन भोकनळ (५ एप्रिल, १९९१) हा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी रोइंगपटू आहे.

दत्तू बबन भोकनळ
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव दत्तू बबन भोकनाळ
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक ५ एप्रिल, १९९१ (1991-04-05) (वय: ३३)
जन्मस्थान तळेगाव रोही तालुका चांदवड जिल्हा नाशिक महाराष्ट्र.
उंची ६फुट ७ इंच
खेळ
देश भारत
खेळ रौइंग
खेळांतर्गत प्रकार सिंगल स्कल्स
प्रशिक्षक कुदरत अली आणि इस्माईल बेग
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर २०१६ उन्हाळी रिओ ( ब्राझील)

नाशिक जिल्ह्यातल्या तळेगांव या छोट्या गावात एका कामगार कुटुंबात दत्तू भोकनळचा जन्म झाला. वडिलांचे कर्करोगाने निधन झाल्याने कुटुंब पोसण्यासाठी दत्तू लष्करात भरती झाला. बीड जिल्ह्यात झालेल्या चाचण्यांत उत्तीर्ण होऊन तो लष्करात आला.

पुण्यातल्या खडकी येथील बॉंबे इंजिनिअरिंग ग्रुप या लष्कराच्या शाखेत काम करताना भोकनळने रोइंग मध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. तेथील कुसरत अली हे त्याचे पहिले शिक्षक होते.. या खेळातील पुढील शिक्षण घेण्यासाठी तो पुण्यातीलच आर्मी रोइंग नोडमध्ये बदलीवर गेला. तेथे रोइंगचे राष्ट्रीय कोच इस्माईल बेग यांनी त्याला मार्गदर्शन केले. भोकनळने २०१४ मधील राष्ट्रीय रोइंग स्पर्धेत भाग घेऊन दोन सुवर्ण पदके जिंकली. त्याच वर्षी चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले.

कारकीर्द

संपादन
  • २०१४ मधील राष्ट्रीय रोइंग स्पर्धेत दोन सुवर्ण पदके
  • २०१५ एशियन चॅम्पियन शिप एक रौप्य पदक
  • २०१६ एशियाना आणि ओशियना ऑलिम्पिक पात्रता फेरी रौप्य पदक
  • २०१६ अमेरिकन नॅशनल चॅम्पियनशिप एक सुवर्ण पदक
  • २०१६ रिओ ऑलिम्पिक ब्राजील १३वा जागतिक क्रमांक
  • २०१६ साली चीनमध्ये झालेल्या १६व्या आशियाई रोइंग स्पर्धेत दत्तू भोकनळने रौप्य पदक मिळवले.
  • २०१६ दक्षिण कोरियातल्या चुंग जू येथील ‘फिसा एशियन ॲन्डओशॅनिक ऑलिंपिक क्वालिफिकेशन’ या नौकानयनाच्या स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी सामन्यात रौप्य पदक.
  • २०१६ सालच्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेण्याची संधी. भारताकडून रोइंगसाठी पात्र ठरलेला तो एकमेव खेळाडू होता.
  • २०१७ इनडोर नॅशनल चॅम्पियन शिप स्पर्धेत एक सुवर्ण पदक
  • २०१७ सीनियर नॅशनल चॅम्पियन शीप मध्ये दोन सुवर्ण पदक
  • २०१७ महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट शिव छत्रपती पुरस्काराने सन्मान
  • २०१८ सालच्या इंडोनेशिया मध्ये झालेल्या एशियन गेम्स मध्ये एक सुवर्ण पदक
  • २०२० भारत सरकारचा क्रीडा क्षेत्रातला सर्वोत्तम अर्जुन पुरस्काराने सन्मानित
  • २०२० महाराष्ट्रातील रौईंग खेळातील पहिला अर्जुन पुरस्कार विजेता

संदर्भ

संपादन

[]

  1. ^ ""गोल्डमॅन' दत्तूच्या  गावात दिवाळी". www.esakal.com. 2018-08-28 रोजी पाहिले. no-break space character in |title= at position 22 (सहाय्य)