दत्तात्रय बळवंत पारसनीस

(दत्तात्रेय बळवंत पारसनीस या पानावरून पुनर्निर्देशित)

रावबहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीस (जन्म : बोरगांव-कोरेगांव तालुका-सातारा जिल्हा; २७ नोव्हेंबर १८७०; मृत्यू : ३१ मार्च १९२६) हे महाराष्ट्रातील एक इतिहाससंशोधक व ऐतिहासिक साधनांचे संग्राहक होते. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना रावबहादुर हा किताब दिला.

दत्तात्रेय बळवंत पारसनीस
जन्म २७ नोव्हेंबर, १८७०
बोरगांव, कोरेगांव तालुका, सातारा जिल्हा
मृत्यू ३१ मार्च, १९२६
पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार इतिहास
प्रसिद्ध साहित्यकृती हिस्टरी ऑफ द मराठा पीपल
वडील बळवंतराव पारसनीस
आई बयाबाई पारसनीस
विकिस्रोत
दत्तात्रय बळवंत पारसनीस हा शब्द/शब्दसमूह
विकिस्रोत, या ऑनलाईन मुक्त मराठी ग्रंथालयात पाहा.

कौटुंबिक माहितीसंपादन करा

पारसनिसांचे घराणे मूळचे सातारा जिल्ह्यातील मळवडीचे होते. वडील बळवंतराव महसुली खात्याच्या नोकरीनिमित्त साताऱ्यास आले आणि स्थायिक झाले. यांच्या आईचे नाव बयाबाई होते. पारसनिसांचे शिक्षण इंग्रजी सहावीपर्यंत झाले. त्यांच्या पत्नीचे नाव आनंदीबाई असून त्यांना सहा मुलगे व दोन मुली झाल्या.

ऐतिहासिक लेखनसंपादन करा

पारसनिसांनी जानेवारी १८८७ मध्ये सुभाष्य चंद्रिका नावाचे मासिक काढले आणि सहा अंक निघाल्यानंतर त्यांनी इ.स. १८८७मध्ये सुरू केलेल्या महाराष्ट्र कोकिळ या मासिकात समाविष्ट केले. त्या मासिकातून मराठेशाहीतील प्रसिद्ध व्यक्तींशी संबंधित कागदपत्रे प्रसिद्ध होत.

ऐतिहासिक कागदपत्रे प्रसिद्ध करता यावीत म्हणून पारसनिसांनी भारतवर्ष आणि इतिहास संग्रह नावाची नियतकालिके चालू केली. भारतवर्ष वर्षभरातच बंद पडले पण इतिहास संग्रह आठ वर्षे चालले. या नियतकालिकांतून पारसनिसांनी सहा हजारांहून अधिक अस्सल ऐतिहासिक कागदपत्रे प्रकाशित केली.

ते पेशवे दप्तराचे काम करू लागले त्याच वर्षी नोव्हेंबर १८९६मध्ये, पारसनिसांनी भारतवर्ष नावाचे मासिक पुस्तक काढले. त्याचे अनियमितपणे २४ अंक निघाले. १९०० साली ते बंद पडल्यावर त्यांनी १९०८मध्ये इतिहास संग्रह नावाचे मासिक काढले, ते १९१६मध्ये बंद पडले. या सर्व मासिकांमधून पारसनीस यांनी ऐतिहासिक कागदपत्रे प्रकाशित केली. रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांनी नाना फडणीस यांच्या मेणवलीतल्या वंशजांकडून मिळविलेल्या दप्तरातील माहितीचा उपयोग पारसनिसांनी त्यांच्या लेखांत केला.

पारसनिसांच्याच प्रेरणेने व प्रयत्नांनी सातारा येथे १९२५ मध्ये ऐतिहासिक संग्रहालय स्थापन झाले. १९३९ साली हे संग्रहालय त्यातील कागदपत्रांसह पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात हलविण्यात आले. पारसनिसांच्या संग्रहात मराठेशाहीतील विशेषतः अठराव्या शतकातील घटनांसंबंधीची अनेक अस्सल कागदपत्रे होती; त्याचप्रमाणे त्यांनी संग्हित केलेली जुनी नाणी, चित्रे, कलाकुसरीच्या वस्तू, पोषाख आणि पेहराव आदींचे नमुने होते. द.ब. पारसनीस यांनी ऐतिहासिक पत्रे, हस्तलिखिते इत्यादींचाही मोठा संग्रह केला होता.

लेखनसंपादन करा

पारसनिसांचे लेखन विपुल आहे. त्यांनी नियतकालिकांतून प्रसिद्ध केलेली बहुतेक कागदपत्रे पुढे ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाली.

मराठीसंपादन करा

  • अयोध्येचे नबाब (१८९१)
  • ए.ओ. ह्यूम (१८९३)
  • कीर्तिमंदिर (१८९२)
  • झाशीची राणी : झांशीच्या महाराणी लक्ष्मीबाईसाहेब यांचे चरित्र (१८९४)
  • दिल्ली अथवा इंद्रप्रस्थ (१९०२)
  • बायजाबाई शिंदे यांचे चरित्र (१९०२)[१]
  • महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर यांचे चरित्र व पत्रव्यवहार (१९००)
  • मराठ्यांचे आरमार (१९०४)
  • महादजी शिंदे याजकडील राजकारणे - ५ खंड (१९१५)
  • महाबळेश्वर (१९१६)
  • मुसलमानी आमदानीतील मराठे सरदार (१९००)
  • सवाई माधवराव पेशव्यांचा दरबार (१९०५).
  • या पुस्तकांखेरीज पारसनीसांनी रावबहादुर गणेश चिमाजी वाड तसेच पुरुषोत्तम मावजी यांच्याबरोबर काही पुस्तके संपादित केली आहेत.


इंग्लिश ग्रंथसंपादन करा

  • ट्रीटीज, एन्गेजमेन्ट्स ॲन्ड सनद्ज, बाॅम्बे (सहसंपादक - पी.व्ही. मावजी+जी.सी. लाड)
  • दि सांगली स्टेट (१९१७)
  • पूना इन बायगॉन डेज (१९२१)
  • द सांगली स्टेट (इंग्रजी, १९१७)
  • महाबळेश्वर (१९१६)
  • सातारा (१९०९)
  • ए हिस्टरी ऑफ द मराठा पीपल, ३ खंड (सहलेखक सी. ए. किंकेड १९१२–२२), इत्यादी. अखेरचे पुस्तक वगळता उरलेली पुस्तके विविध ऐतिहासिक स्थळांबद्दल माहिती देणारी आहेत. विशेषतः ब्रिटिश सनदी अधिकाऱ्यांना उद्देशून ती लिहिलेली आहेत.

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ "पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/1 - विकिस्रोत". mr.wikisource.org. 2020-05-14 रोजी पाहिले.