दंडोबाचा डोंगर हा सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्याच्या सीमेवर खरशिंग गावाजवळचा पाच ग्रामपंचायतींच्या हद्दीत सुमारे ११५० हेक्टरवर पसरलेला एक डोंगर आहे. डोंगरावर पुरातन दंडनाथाचे देऊळ आहे. डोंगरात सुमारे शंभर ते सव्वाशे फूट पोखरून तयार केलेल्या गुहेतच नागाच्या वेटोळ्यात दंडनाथाची मूर्ती आहे. प्रदक्षिणा घालण्यासाठी अतिशय सुरेख पद्धतीने रस्तादेखील असून पुरातन काळातील चित्रे आता कालौघात पुसट झाली आहेत.

डोंगरावर एक पाच मजली मनोरा आहे. मनोऱ्याचा सर्वांत वरचा भाग आहे तेथे चार ते पाच माणसे उभी राहू शकतील एवढीच जागा आहे. पहिल्या टप्प्यावर जायला पायऱ्या आहेत, पण तिथून पुढे वरती जायला मानवनिर्मित पायऱ्या नाहीत; सध्या तेथे एक दगड आहे; त्याचा उपयोग करून वरती जाता येते. चौथ्या टप्प्यावर वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत. एका वेळी एकच माणूस जाईल एवढीच जागा आहे. वरती गेल्यावर या परिसरातला अंदाजे साठ ते सत्तर किलोमीटरचा प्रदेश दिसतो. स्थानिक लोकांच्या मते जर वातावरण चांगले असेल तर मनोऱ्यावर उभे राहिल्यावर विजापूरच्या गोल-घुमटाचे शिखर दिसते.[]

भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भूमिगत क्रांतिकारकांचे नेते रत्नाप्पा कुंभार यांचे या ठिकाणी गुप्त वास्तव्य व कचेरी होती.[]

पुण्यातून दंडोबाच्या डोंगराकडे जाण्याचा रस्ता

संपादन

पुणे-सांगली-मिरज-कवठे महांकाळ-खरशिंगफाटा-दंडोबाचा डोंगर. (एकूण अंतर : सुमारे २७५ किमी)

संदर्भ

संपादन
  1. ^ https://maharashtratimes.indiatimes.com/travel-news/dandoba/articleshow/48905091.cms[permanent dead link]
  2. ^ [ रत्नाप्पांच्या ८५ व्या वाढदिनाप्रित्यर्थ ' रुद्रवाणी ' या पाक्षिकात त्यांचे नंतरच्या काळतील राजकीय विरोधक व इचलकरंजीचे माजी आमदार कॉग्रेड एस. पी. पाटील यांनी लिहीलेला लेख-ऑक्टोबर १९९४