थियाट्टम

(थियाट्टू या पानावरून पुनर्निर्देशित)

थियट्टम किंवा थियाट्टू हा एक पारंपारिक नृत्य प्रकार आहे. थियट्टमचे दोन प्रकार आहेत – भद्रकाली थियाट्टू आणि अय्यप्पन थियाट्टू.[] भद्रकाली थियाट्टू थियाट्टून्नीस (केरल मधील ब्राह्मण समाज) लोकांद्वारे केले जाते तर अय्यप्पन थियाट्टू, तिय्याडी नाम्बियार (अम्बालावासी) लोकांद्वारा केले जाते.

भद्रकाली थियाट्टू

संपादन

भद्रकाली थियाट्टू नृत्यप्रकार एका धार्मिक विधीप्रमाणे आहे जो भद्रकाली देवीच्या मंदिरात सादर केला जातो, सहसा दक्षिण केरळ मधील पथनामथीट्टा, अलाप्पुझा, कोट्टायम आणि एर्नाकुलम जिल्ह्यांमध्ये सादर केले जाते.[] कोट्टायम येथील थ्रीक्कारीयूर महादेव मंदिर (कोट्टाराथिल संकुंनी परिवाराचे मंदिर) पल्लीप्पूरथु कावू, कोथामंगलम येथील पानाचीमंगलथ भद्रकाली भद्रकाली मंदिर (पानाचीमंगलथ इल्लम परिवाराचे मंदिर), थोडूपुझाजवळील, मदक्काथनम येथील वनारकाऊ, थीरुवल्ला जवळील पुथूकुलांगारा देवी क्षेत्रम ही काही ठिकाणे आहेत जेथे वार्षिक सणानिमित्त थियाट्टू हा नृत्यप्रकार सदर केला जातो.

ह्या नृत्यप्रकारचे विविध अंग आहेत, ज्यात – धार्मिक विधीची तयारी ज्याला कलम (कलामेझुथू) असे ओळखले जाते, भद्रकाली देवीची गाणी गाणे आणि नृत्य सदर करणे हे त्यापैकी काही.[] कलामेझुथू हे जमिनीवर नैसर्गिक रंगांचे पावडर कलर वापरून दिवसा केले जाते. सहसा भद्रकाली देवीचे चित्र काढले जाते. नंतर त्यासमोर कलामेझुथू संपल्यानंतर गाणी गायली जातात. कधी कधी हे ३ तासापर्यंत सुद्धा चालते. नृत्याकरिता कुणीतरी पुरुष भद्रकालीचे कपडे परिधान करतो. त्या प्रयोगात ती नुकतीच दारीकाचा वध करून आलीये आणि सगळा घटनाक्रम शिवला सांगत आहे. तिला देवीचा आजार झाला असल्याने आणि तिच्या चेहऱ्यावर त्याचे व्रण असल्याने संपूर्ण प्रयोगात ती शिवाकडे पाठ करून उभी आहे. श्री भद्र कलासमाजम, कोट्टायम ने या कलाप्रकाराचे पुनुरुज्जीवन करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यामध्ये धार्मिक विधींचा समावेश असल्याने आणि कडक पारंपारिक पद्धती असल्याने, ज्या अजूनही काटेकोरपणे पाळल्या जातात, कुणाच्याही इच्छेनुसार थियाट्टू मध्ये बदल करता येणे शक्य नाही.

अय्यप्पन थियाट्टू

संपादन

अय्यप्पन थियाट्टू ही एक मंदिराची कला आहे जी मध्य केरळ मधील तीन जिल्हे थ्रीस्सुर, पलक्कड आणि मलप्पुरम या जिल्ह्यांमध्ये राहणारा एक अल्पसंख्यांक समाज थिय्याड्डी नंबियार समाजातर्फे सादर केली जाते.[] सगळे पुरुष कलाकार असलेल्या या प्रयोगामध्ये मोहिनी हा स्त्रीवेष घेतलेल्या विष्णू आणि भगवान शंकर यांना झालेला पुत्र भगवान अय्यप्पा ह्यांच्या जन्माची कहाणी सादर केली जाते.

थियाट्टूच्या या प्रकाराच्या सादरीकरणामध्ये सामान्यपणे चार भाग असतात: १) कालामेझुतू (कालमचे- अय्यापाचे नैसर्गिक रंग वापरून चित्र काढणे), २) कोट्टूम पट्टूम – अय्यापांच्या जन्माच्या निरंकुश गाण्यांचे भाषांतर, ३) कुथू – अय्यापांच्या जन्माची कहाणी सांगणारे, हावभाव दाखवून केलेले नृत्य, आणि ४) वेलीचचाप्पाड्डू (हळूहळू वेग वाढवत केलेले भ्रांतचित्त हरवणारे नृत्य जे हळूहळू अय्यापांचे चित्र मिटवते.). सहसा हे चित्र काढण्यासाठी साधारण २ तासांचा वेळ लागतो तर त्यापुढचे ३ भाग पार पडण्यासाठी साधारण तीन तासांचा वेळ लागतो.[]

अय्यापांच्या चित्राचे रेखाटन तसेच सुशोभीकरण पाच नैसर्गिक रंगांचा वापर करून केले जाते – पांढरा (तांदळाची पावडर), पिवळा (हळद), हिरवा (मनचंडी किंवा वाकाची हिरवी पाने), लाल (हळद आणि चुन्याचे मिश्रण) आणि काळा (भाताचा चुरा). अय्यापाच्या हातात तलवार आणि दुसऱ्या हातात धनुष्य आणि बाण दाखविण्यात येतो. काही वेळा अधिक विस्तृतपणे दाखवितांना त्यांना वाघ किंवा घोड्यावर आसनस्थ दाखविण्यात येते.

गाणी- पाराच्या तालावर, जे कि चेंडा या वाद्याचा एक लहान प्रकार आहे, गायली जातात. त्यांचा उद्गम केरळी संगीतातील सोपानम रागापाशी येऊन पोचतो.

कुथू – हे विना मेकअप पण विविध वेशभूषा करून सादर केले जाते. शून्य हावभाव, कमीत कमी नृत्याभाव आणि हातवारे जवळपास कुडीयट्टम आणि कथकली प्रमाणे असतात.[]

थिय्याड्डी नंबियार परिवार जरी त्यांचे मध्य केरळ मध्ये वास्तव्य असले तरी उत्तरेला असलेल्या मलबार पट्ट्यामध्ये या प्रकाराला असलेल्या प्रसिद्धीचा पुरेपूर आनंद घेतात.

संदर्भ

संपादन
  1. ^ "Thiyyattu Dance, Kerala".
  2. ^ "Theeyattu/Bhadrakali Theeyattu/Traditional Art form of Kerala".
  3. ^ "Kalamezhuthu - Folk and Tribal Art - Culture and Heritage". 2018-01-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-08-22 रोजी पाहिले.
  4. ^ "Ayyappan Thiyyattu".
  5. ^ "Theeyaattu". 2017-10-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-08-22 रोजी पाहिले.
  6. ^ "Ayyappan Thiyyattu: A Kerala Traditional Art of Colour, Music & Dance".