त्रुहियो हे होन्डुरासमधील छोटे शहर आहे. कोलोन प्रांताचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २००३च्या अंदाजानुसार ३०,००० होती.

क्रिस्तोफर कोलंबस आपल्या चौथ्या सफरीवर असताना १४ ऑगस्ट, इ.स. १५०२मध्ये येथे उतरला होता. हे शहर काही काळासाठी होन्डुरासची राजधानी होते. अमेरिकन लेखक ओ. हेन्री त्रुहियोमध्ये काही काळ राहिला होता. त्याने नंतर लिहिलेल्या लघुकथांमध्ये आंचुरिया या काल्पनिक देशातील कोरालियो शहराचा उल्लेख वारंवार येतो. कोरालियो शहर त्रुहियो वर आधारित होते.