वर्तुळाचा मध्य बिंदू आणि त्या वर्तुळाच्या परिघावरील कोणताही बिंदू यांना जोडणाऱ्या सरळ रेषेस किंवा तिच्या लांबीस त्रिज्या म्हणतात. वर्तुळात असंख्य त्रिज्या काढता येतात, आणि सर्वांची लांबी सारखीच असते. त्रिज्या व्यासाच्या निम्मी असते. त्रिज्या माहीत असल्यास वर्तुळाचे क्षेत्रफळ व परिघाची लांबी काढणे शक्य आहे.

समजा

r = त्रिज्या , c = परिघ , A = क्षेत्रफळ

वर्तुळाकार किंवा चक्राकार गतीने फिरत असलेल्या वस्तूची गती त्या वर्तुळाच्या त्रिज्येवर अवलंबून असते.