तो आणि ती
तो आणि ती आंतराष्ट्रीय कीर्तीचे मानसशास्त्रज्ञ डॉ. जॉन ग्रे यांच्या मेन आर फ्रॉम मार्स, विमेन आर फ्रॉम व्हिनस या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. या पुस्तकाचा अनुवाद डॉ. रमा मराठे यांनी केला आहे.
हे पुस्तक स्त्री व पुरुष यांच्या नाते संबधातील मानसशास्त्रीय बाजू समजून घेण्यात अतिशय उपयुक्त असे आहे. स्त्री-पुरुष यांच्यातील भेद व वैशिठ्ये यांची तपशीलवार चर्चा या पुस्तकात आहे. बहुतांशी पुरुषांची तक्रार असते की बायकांना समजणे महाकठीण काम असते. तर स्त्रीयांना त्यांचे नवरे अथवा प्रियकर असेच का हे उमगत नाही. परिणीती स्त्री पुरुष नात्यांतील तणावात होते. आजकालच्या जीवनात घरगुती आयुष्यातील बहुतांशी तणाव हे याच स्वरूपाचे असतात. या पुस्तकात हे तणाव कमी करून नातेसंबध कडे सुधारण्याचे अनेक शास्त्रीय मार्गाचा उहापोह केला आहे.