तुवरक (चालमोगरा)ची झाडे १५ ते ३० मीटर उंच, सदाहरित आणि मध्यम आकारमानाची असतात. त्यांच्या शाखा जवळजवळ गोलाकार व केसाळ असतात. खोडावरची साल भुरकट रंगाची, फटीयुक्त, खडबडीत असते. पाने सरळ, एकांतरित १० ते २२ सेंटिमीटर लांब आणि सुमारे ३ ते १० सेंटिमीटर रुंद गडद हिरव्या रंगाची असतात.

तुवरक वृक्षाचे फूल छोटे, सफेद व एकलिंगी असते.. फळे ५-१० सेंटिमीटर व्यासाची अंडाकार किंवा गोलाकार आणि रसभरित असतात. फळाच्या आतल्या सफेद गरात बदामासारख्या पिवळट १५-२० बिया असतात. तुवरक वृक्षाला ऑगस्ट ते मार्च या काळात फुले व फळे असतात.

तुवरकाचे तेल हे एक आयुर्वेदिक औषध आहे.

तुवरकाची अन्य भा़षांतील नावेसंपादन करा

 • Bengali- चौलमुगरा (Chaulmugra)
 • English- मरोठी ट्री (Morothi Tree), चालमोगरा (Chalmoogra)
 • Kannada- गरुडफल (Garudphal), सुंती (Suranti)
 • Gujarati- गुंवाडीयो (Guvandiyo)
 • Persian- विरमोगरा (Virmogara), Jungali almond (जंगली आलमन्ड)
 • Malayalam- कोटी (Koti), मारा वेट्टी (Mara vetti)
 • Marathi- कटुकवथ (Katukavath)
 • Nepali- तुवरक (Tuvrak)
 • Sanskrit- गरुडफल, तुवरक, कटुकपित्थ, कुष्ठवैरी
 • Tamil- मरावेट्टई (Maravettai), निरादि मुट्टु (Niradi muttu)
 • Telugu- आदि-बदामु (Adi-badamu)
 • Hindi- चालमोगरा
 • शास्त्रीय नाव - Hydnocarpus laurifolia (Dennst.) Sleummer