तुरीयातीत उपनिषद उपनिषद शुक्ल यजुर्वेदाशी संबंधित आहे. यालाच ‘तुरीयातीत-अवधूत उपनिषद’ असेही म्हणतात. या उपनिषदामध्ये पितामह ब्रह्माजी आणि आदिनारायण यांच्यामधील प्रश्न-उत्तरे दिलेली आहेत; ज्याच्यात ब्रह्माजींनी आपले पिता आदिनारायण यांना तुरीयातीत-अवधूत मार्गाबद्दल विचारलेले आहे. आदिनारायणांनी या मार्गावर चालणारांची दुर्लभता सांगून अवधूताचे आचरण-व्यवहार, चिंतन-मनन यांची कार्यपद्धती सांगितलेली आहे. तिचा प्रत्यक्ष व्यवहारात अवलंब करून व्यक्ती आपल्या जीवनाचे परमलक्ष्य प्राप्त करून घेऊ शकते. शेवटी या उपनिषदाच्या श्रेष्ठत्वाचे प्रतिपादन केलेले आहे.