तिरुमलई कृष्णमाचार्य
तिरुमलई कृष्णमाचार्य (१८ नोव्हेंबर १८८८ - २८ फेब्रुवारी १९८९) एक भारतीय योग शिक्षक, आयुर्वेदिक वैद्य व अभ्यासक होते.[१] अनेकदा ते "आधुनिक योगाचे जनक" म्हणून संबोधले जात.[२][३] कृष्णमाचार्य २०व्या शतकातील सर्वात प्रभावी योग शिक्षकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. पूर्वीचे श्री योगेंद्र आणि स्वामी कुवलयानंद यासारख्या अग्रगणितांप्रमाणे त्यांनीही हठ योगाच्या पुनरुत्थानास हातभार लावला.
भारतीय योग शिक्षक, आयुर्वेदिक वैद्य व अभ्यासक | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | Tirumalai Krishnamacharya | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | नोव्हेंबर १८, इ.स. १८८८ चित्रदुर्ग जिल्हा | ||
मृत्यू तारीख | फेब्रुवारी २८, इ.स. १९८९ चेन्नई | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
अपत्य |
| ||
| |||
कृष्णामाचार्य यांनी सर्व सहा वैदिक दार्शन (भारतीय तत्त्वज्ञानांत) पदवी धारण केली होती. म्हैसूरचा राजा कृष्णा राजा वाडियार चतुर्थ यांच्या संरक्षणाखाली कृष्णामाचार्य योगासनाचे प्रवचने आणि प्रात्यक्षिके देत भारतभर फिरले. हृदयाचे ठोके थांबवण्याचे प्रयोग पण त्यांनी दाखवले होते. १९४० मध्ये कृष्णा राजा वाडियार चतुर्थ यांचे निधन झाले. त्यांचे पुतणे आणि वारसदार जयचमराजेंद्र वाडियार यांनी कृष्णामाचार्यांना यापुढे ग्रंथ प्रकाशित करण्यास आणि आसपासच्या भागात शिक्षकांचे पथक पाठविण्यास पाठिंबा दिला नाही. १९४६ मध्ये झालेल्या राजकीय बदलांनंतर, भारताला स्वातंत्र्य मिळताच नवीन सरकार अस्तित्वात आले आणि महाराजांच्या अधिकारांना आळा घालण्यात आला. योग शाळेसाठी दिलेला निधी थांबवण्यात आले आणि कृष्णमाचार्य यांनी शाळा टिकविण्यासाठी संघर्ष केला. वयाच्या ६० व्या वर्षी (१९४८ मध्ये) कृष्णामाचार्य यांना विद्यार्थी शोधण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाची देखभाल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवास करावा लागला. म्हैसूरमधील योगशाला के. सी. रेड्डी (म्हैसूर राज्याचे पहिले मुख्यमंत्री) ने बंद ठेवण्याचे आदेश दिले. म्हैसूर सोडल्यानंतर कृष्णामाचार्य दोन वर्षे बंगळुरूला गेले आणि त्यानंतर १९५२ मध्ये मद्रास येथे स्थलांतरित होण्यासाठी त्यांना बोलावण्यात आले. मद्रासमध्ये, कृष्णमाचार्य यांनी विवेकानंद महाविद्यालयात व्याख्याता म्हणून नोकरी स्वीकारली. वयाच्या ९०व्या वर्षी कृष्णमाचार्य यांचे हिप फ्रॅक्चर झाले. शस्त्रक्रियेस नकार देऊन, त्याने स्वतःचा उपचार केला आणि अंथरुणावर झोपण्याच्या पद्धतीचा अभ्यासक्रम तयार केला. कृष्णामाचार्य चेन्नईमध्येच कोमामध्ये गेले आणी १९८९ मध्ये शंभर वर्षांच्या वयात मरण पावले.
त्यांना व्यापकपणे विन्यासचे शिल्पकार म्हणून मानले जाते. श्वासोच्छवासासह हालचाल एकत्रित करण्याच्या त्यानी बनवलेल्या योगाच्या शैलीला विनीयोग किंवा विन्यास कर्म योग असे म्हणतात. कृष्णामचर्याच्या सर्व शिकवणींचे मूळ तत्त्व होते की एखाद्या व्यक्तीला योग्य तेच शिकवा. योगी म्हणून जगाच्या इतर भागात त्याचा आदर केला जात असतांना, कृष्णामाचार्य प्रामुख्याने आयुर्वेदिक वैद्य म्हणून भारतात ओळखले जातात. त्यांनी योग यावर चार पुस्तके लिहिली - योग मकरंद (१९३४), योगसंगालु (१९४१), योग रहस्या, आणि योगावल्ली (अध्याय १९८८) - तसेच अनेक निबंध आणि काव्यात्मक रचना.
कृष्णामाचार्य यांच्या विद्यार्थ्यांमध्ये योगातील अनेक नामांकित आणि प्रभावी शिक्षकांचा समावेश आहे: ईंद्रा देवी, कृष्ण पट्टाभि जोयीस, बी.के.एस. अय्यंगार, टी. के. व्ही. देसीकाचार, ए. जी. मोहन, श्रीवत्स रामास्वामी.
संदर्भ
संपादन- ^ "Krishnamacharya Yoga Mandiram". 11 एप्रिल 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ Mohan, A. G.; Mohan, Ganesh (5 April 2017) [2009]. "Memories of a Master". Yoga Journal.
- ^ "The YJ Interview: Partners in Peace". Yoga Journal.