तालिकोट (किंवा ताळिकोट) तथा तालिकोटे (किंवा ताळिकोटे) हे कर्नाटक राज्याच्या विजापूर जिल्ह्यातील छोटे शहर आहे. २०११च्या जनगणनेनुार येथील लोकसंख्या ३१,६९३ होती.

२३ जानेवारी, १५६५ रोजी येथे झालेल्या लढाईत दखनेतील पाच मुस्लिम सुलतानांनी विजयनगर साम्राज्याचा पराभव केला. येथून दक्षिण भारतात अनिर्बंध मुसलमान सत्ता सुरू झाली.