तांबडी शैल तिरचिमणी (इंग्लिश:Rufous Rock Pipit) हा आकाराने बुलबुलएवढा पक्षी आहे.

तांबडी शैल तिरचिमणी

या पक्ष्याचा वरील भागाचा रंग तपकिरी असतो. डोके व पाठीवर फिक्कट रेषा, पिवळट वर्णाची भुवई असते तर पंख व शेपटीचा वर्ण गर्द असतो. शेपटीची किनार पांढुरकी, खालील भाग आणि गळा पांढुरका असतो. उरलेला भाग गुलाबी असतो. पिवळट छातीवर तपकिरी रंगाच्या फिक्कट रेषा असतात.

वितरण

संपादन

ते पश्चिम घाटात पुण्याजवळ, जालना, नैऋत्य कर्नाटक,तामिळनाडू या ठिकाणी आढळतात.

निवासस्थाने

संपादन

ते कातळ, खडकाळ व ओसाड शेतीचा प्रदेश तसेच गवती डोंगराळ प्रदेश या ठिकाणी राहतात.

संदर्भ

संपादन
  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली