'तलेदंड' हे एक लोकप्रिय एतिहासिक नाटक आहे. राम जन्मभूमी - बाबरी मस्जिद प्रकरण आणि मंडल आयोग अहवाल या दोन महत्त्वाच्या घडामोडी दरम्यान हे नाटक लिहिले गेले. याचे लेखक गिरीश कर्नाड हे आहेत. या दोन घडामोडींमुळे देशाच्या विविध भागात हिंसा, भीती आणि रक्तपात जन्माला आला की, जो १२ व्या शतकातील कर्नाटकमधील सामाजिक- धार्मिक क्षेत्रात बसवेश्वरांद्वारे सुरू करण्यात आलेल्या 'प्रोटेस्टंट मुव्हमेंट' बरोबर एकरुपता दर्शवतो. त्यामुळे सदर नाटक ही समकालीन भारतावर एक गंभीर टीका आहे की, ज्यामुळे लोक सामाजिक, सांस्कृतिक व राजकिय मूल्यांमध्ये, विशेषतः जाती व धर्माबाबत फेरविचार करण्यास भाग पडतील. [१]

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ कांबळे, शिवाजी शंकर (जून २०१८). "गिरीश कर्नाड यांच्या 'तलेदंड' मधील आधुनिकता". संशोधक. : ४७.