तक्षशिला

(तक्षशीला या पानावरून पुनर्निर्देशित)

तक्षशिला (इंग्रजीत Taxila) हे प्राचीन भारतातील एक प्रमुख शहर आणि विद्यापीठ होते.

आत्ताच्या पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात रावळपिंडी शहरापासून ३५ किमी वायव्येस असलेल्या या शहराचे अवशेष सुमारे ३,००० वर्ष जुने आहेत. प्राचीन भारतामध्ये शिक्षणाची अनेक नावाजलेली केंद्र उदयाला आली होती या केंद्रांपैकी तक्षशिला विद्यापीठ हे महत्त्वाचे शिक्षण केंद्र होते या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी परराज्यांतून तसेच परदेशांतूनही विद्यार्थी येत असत. तक्षशिला हे प्राचीन भारतीय व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे शहर होते. सध्या हे स्थान पाकिस्तानमध्ये आहे या ठिकाणी सापडलेल्या पुरातत्त्वीय पुराव्याच्या आधारे हे ठिकाण इसवी सन पूर्व सहाव्या शतकामध्ये उदयास आलेले होते. सम्राट बिम्बिसार याच्या फार आधीपासून प्रसिद्धिस आलेले हे एक विश्व विद्यापीठ म्हणून नावारुपाला आलेले शिक्षणकेंद्र होते. बुद्धांचा समकालीन असलेला व अजातशत्रु राजाचा राजवैद्य म्हणून ख्यातीप्राप्त असलेला जीवक वैद्य याने तक्षशिला विद्यापीठामध्ये शिक्षण घेतले होते. इसवीसन पूर्व चौथ्या शतकात तक्षशिला विद्यापीठाची कीर्ती सर्वदूर पसरली. मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य याचे शिक्षण हे दक्षिणा विद्यापीठांमध्ये झाले होते व्याकरणकार पाणिनी तसेच चरक हा वैद्य हेदेखील तक्षशिला विद्यापीठांमध्ये विद्यार्थी होते सिकंदरा बरोबर आलेल्या ग्रीक इतिहासकारांनी देखील तक्षशिलाची वर्णन केलेले आहे ग्रीसमध्ये कोठेही अशा प्रकारचे विद्यापीठ या काळामध्ये अस्तित्वात नव्हते असे त्यांनी लिहून ठेवलेले आहे चिनी बौद्ध भिक्खू हा इसवी सन चारशेच्या सुमारास भारतामध्ये आला होता त्यावेळी त्याने तक्षशिला विद्यापीठाला भेट दिली या विद्यापीठामध्ये बौद्ध तत्त्वज्ञान,अर्थशास्त्र,तर्कशास्त्र वैद्यकीय तसेच ध्यानसाधना इ. विविध विषयांचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात होते या संदर्भातील सर्व माहिती परकीय प्रवाशांच्या प्रवास वर्णन मध्ये आलेली आहे तक्षशिला हे प्राचीन काळातील एक वैभव संपन्न आणि सामर्थ्यशाली शिक्षण केंद्र म्हणून पुढे आले या शिक्षण केंद्रांमधून अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन पुढे गेले