टोकरे कोळी
आदिवासी टोकरे कोळी समाज हा विशेष करून धुळे,नंदुरबार,जळगांव, नाशिक इत्यादी तसेच राज्याच्या इतर भागात आढळून येतो.ही जमाती आदिवासी वर्गात कनिष्ठ मानली जाते.[ संदर्भ हवा ]
इतिहास
संपादनप्रथम विश्व युद्ध,ब्रिटिश हुकूमतनी आदिवासींना एक योद्धा गट ठरवले होते. कारण प्रथम विश्व युद्ध समयी या समाजाने वीरता दाखवली होती. छत्रपति शिवाजी महाराजांची सेना मधे आदिवासी समाजाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.[ संदर्भ हवा ]
वसतिस्थान
संपादनटोकरे कोळी जमातीचे प्रामुख्याने धुळे,नंदुरबार, जळगाव,नाशिक,ठाणे व राज्याच्या इतर भागात वास्तव्य आहे.[ संदर्भ हवा ]
भाषा
संपादनढोरी बोलीभाषा पण सध्या बोलली जात नसल्याने जास्त करून खानदेश भागात अहिराणी भाषेचा वापर केला जातो.[ संदर्भ हवा ]
देव देवता
संपादनटोकरे कोळी समाजाच्या धर्मविषयक कल्पना, सणवार आणि आचार वैशिष्ट्यपूर्ण आहेत. वाघ्यादेव(वाघोबा), हिरवा, पांढरी, बयरोबा,काळोबा,वरसुआई इत्यादी देव मानतात. सात, घट बसवणे, मोडा पाळणे, वाघ बारस, आखाजी चा पाडवा वगैरे सण पाळतात. सतूबाई, रानाई, घोरपडाई, देवींला मानतात. शेतात खूप गवत माजले, तर ‘कणसरी’ची प्रतिमा करून शेतात ठेवतात. हिंदू धर्माच्या संपर्कात आल्याने विठोबाचे माळकरीही समाजात आढळतात. परंतु आता बदल होत आहे. आपण धर्म संकल्पनेत येत नाही याची त्यांना जाण होऊ लागली आहे. त्यामुळे माळकरी टाळकरी यांच्यात घट होऊन आदिवासी तयार होत आहेत. नवस आणि मंत्रतंत्रावर फार विश्वास असला तरी शिकलेली पिढी यावर आता विश्वास करत नाही. समाजात भगताचे महत्त्व असाधारण आहे. आज शिक्षणामुळे काही प्रमाणात त्यांच्या बुवाबाजीत सकारात्मक बदल होत असल्याचे चित्र आहे.
रूढी व परंपरा
संपादनसमाजातील संस्कार म्हणजे प्रथम ऋतुदर्शनात मुलीची खणा-नारळाने ओटी भरतात. गरोदर स्त्रीचे ओटीभरण करीत नाहीत. स्त्रीचे पहिले बाळंतपण सासरी होते. बाळंतीण बाज वापरीत नाही. जमिनीवरच झोपते. हलिंद(??) व बाळंतिणीला बाजरीचे पीठ कातबोळ्याबरोबर शिजवून देतात. त्याने तिला दूध येते, अशी समजूत आहे. पाचवीला सटवीची पूजा करतात. जमलेल्या आप्तेष्टांत पाच भाकऱ्या व चण्याच्या घुगऱ्या वाटतात. षष्ठीपूजनाच्या वेळी सावा धान्याच्या दोन राशी जमिनीवर ठेवतात. त्यांना देवता समजून हळद-कुंकू वाहतात. त्यांच्यापुढे भात आणि तीळ यांचे पाच लाडू ठेवतात. त्यांतला एक तीळ-तांदळाचा लाडू बाळंतीण घरातील मोरीला अर्पण करते. बाळंतिणीच्या खोलीत भिंतीवर अकरा मानवाकृती काढतात. त्यांत ‘बाहुला’ ऊर्फ ‘बळी’ नावाची एक आकृती असते. तिचे डोके शेंदराने काढतात आणि पूजा करतात. त्यांना दूध, दही, खेकडा यांचा नैवेद्य दाखवतात. मूल रांगू लागले, की पंचपावली करून कुळदेवतेची पूजा करतात. मुलाचे नाव दहाव्या दिवशी ठेवतात व जावळ काही महिन्यांनी काढतात. जावळ काढण्याचा मोठा समारंभ असतो. जावळ गुरुवार, शुक्रवार अगर रविवार या दिवशी काढतात. मूल पाऊल टाकू लागले, की पावलाच्या आकाराएवढ्या तांदळाच्या पिठाच्या पाच आकृत्या करून त्या उकडून काढतात व पाच शेजाऱ्यांना वाटतात. समाजात मृताला जाळतात किंवा काही भागात पुरतात. लग्न गोत्र पाहून होते. एवढेच नव्हे, तर विशिष्ट गोत्रांतच विवाह होतात.[ संदर्भ हवा ]
या समाजामध्ये बालविवाह प्रचलित नव्हता, आताही होत नाहीत. परंतु एकंदरीत आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने मुलांना शिकविण्याऐवजी त्यांचे लग्न लवकरात लवकर लावण्याचाच प्रयत्न केला जातो. लग्न वडील माणसांमार्फत ठरते. मुलीचे द्याज देतात. प्रथम साखरपुडा होतो. लग्न मुलीच्या घरी मांडवात होते. लग्नात खूपच बारीकसारीक विधी असतात. आदिवासी कोळ्यांमध्ये हुंडा घेतला जात नाही व दिलाही जात नाही.[ संदर्भ हवा ]
उपजीविका व व्यवसाय
संपादनटोकरे कोळी-ढोर कोळी समाजातील लोकांचा पूर्वीच्या काळी टोकरे कोळी हे जंगलातील टोकरा (बांबू)पासून टोपल्या विणत असत व त्या खेडोपाडी जाऊन विकत असतं त्यावर त्यांचा उदरिर्वाहही चालत असे, मेलेल्या जनावरे गावा बाहेर फेकणे, गावांची राखणदारी करणे असली हलकी गाव कामगार ची कामे टोकरे कोळी समाजातील लोकांनी केली. या कार्याच्या गौरवार्थ ब्रिटिश शासनाने यांना इनामी जमिनी या भेट दिल्या. ढोर कोळी हे नाव विचित्र वाटत असल्याने आणि समाजात वेगळेपणाची भावना मिळत असल्याने ढोर कोळी ऐवजी यांना टोकरे कोळी या नावाने ओळखले जातात. सध्या शेती करण्यावर भर आहे. जंगलातून गोळा करून आणलेल्या वस्तू विकूनही पुरेसे पैसे मिळत नाही. जंगलातील वनोपजाचे व्यवस्थापन व वापराचे हक्क या समाजाला मिळाले तर दोहोंची समृद्धी शक्य आहे.[ संदर्भ हवा ]
टोकरे कोळी/ ढोर कोळी हे डोंगर भाग म्हणजे राज्यातील धुळे, नंदुरबार, जळगाव ,ठाणे व राज्यात इतरत्र आढळतात. धुळे,जळगाव येथील टोकरे कोळी बांधव तापी नदी किनारी प्रामुख्याने वसला असल्या कारणाने हे मुख्यत्वे करून मासेमारी करून जगतात.नदीतील मासेमारी ,मासे पकडण्याची त्याची विशिष्ट पद्धत त्यावरूनच या जमातीला टोकरे कोळी/ढोर कोळी असे नाव पडले.