डेक्कन कॉलेज पुरातत्त्व संग्रहालय

डेक्कन कॉलेज पुरातत्त्व संग्रहालय पुण्यातील डेक्कन कॉलेजमधील संग्रहालय आहे.

पुरतत्त्व संग्रहालयात मानवाच्या सांस्कृतिक इतिहासाचे टप्पे दाखवणाऱ्या लोहयुगातील वस्तू, भारतीय कलावस्तू, नाणी, पुराभिलेख आदी गोष्टी आहेत. संग्रहालय पाहताना मानवाच्या प्रारंभापासून ते प्रगत अवस्थेपर्यंतचा परिचय विविध स्वरूपाच्या अवशेषांपासून, आयुधांतून व अलंकारांतून होतो. पाषाणयुग, लोहयुग, ताम्रपाषाणयुग, शिल्पकला, नाणकशास्त्र, वांशिक पुरातत्त्व आदींशी संबंधित वस्तू येथे पहावयास मिळतात. प्रा. हसमुख धीरजलाल सांकलिया यांच्या स्मरणार्थ एक स्वतंत्र कक्षही या संग्रहालयात आहे.[१]

डेक्कन कॉलेजमध्ये याशिवाय मराठा इतिहास संग्रहालय हे दुसरे एक संग्रहालय आहे.

संदर्भ संपादन

  1. ^ डेक्कन कॉलेज अधिकृत संकेतस्थळ. "Archaeology Museum". www.dcpune.ac.in. Archived from the original on 2019-04-25. २५ एप्रिल 2019 रोजी पाहिले.