डी. श्रीनिवास रेड्डी
(डी.श्रीनिवास रेड्डी या पानावरून पुनर्निर्देशित)
डॉ. डी.श्रीनिवास रेड्डी हे पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत औषधांवर संशोधन करणारे एक वैद्यकीय रसायनशास्त्रज्ञ आहेत. विविध प्रकारच्या विकारांवर औषधे तयार करताना त्या विकारांना नेस्तनाबूत करणाऱ्या रेणूंची गरज असते. औषधशास्त्रज्ञ अशा रेणूंचा शोध लावत असतात, त्यांची रचना करीत असतात. या क्षेत्रात डॉ. रेड्डी अनुभवी मानले जातात.
डी. श्रीनिवास रेड्डी यांचे शिक्षण
संपादन- उस्मानिया विद्यापीठातून रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि वनस्पतिशास्त्र घेऊन बी.एस्सी. (१९९१)
- उस्मानिया विद्यापीठातून सेंद्रिय रसायनशास्त्राची एम.एस्सी. (१९९३)
- हैदराबाद विद्यापीठातून प्रा.गोवर्धन मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनशास्त्रात पीएच.डी. (२०००)
- अमेरिकेतील शिकागो आणि कन्सास विद्यापीठांतून उत्तर-पीएच.डी. संशोधन (जून २००० ते नोव्हेंबर २००३)
कारकीर्द
संपादन- हैदराबादला मुख्यालय असलेल्या आंतरराष्ट्रीय ’डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी’त मुख्य शास्त्रज्ञ (डिसेंबर २००३ ते डिसेंबर २००६) आणि रिसर्च इन्व्हिस्टिगेटर (जानेवारी २००७ ते ऑक्टोबर २००७)
- पुण्याच्या अॅडव्हिनस थेराप्युटिक्स कंपनीत संशोधकाचे गटप्रमुख (नोव्हेंबर २००७ ते मार्च २०१०)
- पुण्याच्या राष्ट्रीय प्रयोगशाळेत शाखा प्रमुख (एप्रिल २०१० ते ऑक्टोबर २०१०) आणि नोव्हेंबर २०१०पासून वरिष्ठ रसायनशास्त्रज्ञ, १५ शास्त्रज्ञांवरचे गटप्रमुख.
- डॉ. डी.श्रीनिवास रेड्डी आणि सहकारी यांचे २०१५ सालापर्यंत एकूण ६१ शोधनिबंध प्रकाशित झाले असून त्यांच्या नावावर १८ पेटंटे जमा आहेत. शिवाय, अजून ८ पेटंटांकरिता त्यांनी केलेले अर्ज विचाराधीन आहेत.
पुरस्कार
संपादन- सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट-सीडीआर्आय कडून पुरस्कार (२०१३)
- पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेकडून सायंटिस्ट ऑफ द इयर पुरस्कार (२०१३)
- केमिकल रिसर्च सोसायटी ऑफ इंडिया-सीआर्एस्आय-कडून कांस्यपदक (ऑगस्ट २०१५)