डिझाईन इनोवेशन सेंटर

पुणे विद्यापीठाचे ‘डिझाईन इनोव्हेशन सेंटर’

भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने विद्यापीठात होणा-या संशोधनाचा थेट समाजाच्या गरजा भागवण्यासाठी वापर व्हावा यासाठी विद्यापीठामध्ये “नाविन्यपूर्ण डिझाईन सेंटर” उभारणीसाठीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यामध्ये देशभरात २० नवीन डिझाईन इनोव्हेशन सेंटर सुरू करण्यात येत आहेत.[] त्यातील एक DIC हे पुणे विद्यापीठात सुरू होत आहे. या ‘नाविन्यपूर्ण डिझाईन केंद्राची उपकेंद्रे नाशिक, अहमदनगरपाबळ येथील ‘विज्ञान आश्रम’ ही असणार आहेत.

विद्यापीठातील विविध संशोधन शाखांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधनाचे काम हे सतत चालू असते. पदवी, पदव्युत्यर, पी.एच.डी., इ. अभ्यासक्रमात संशोधन हा महत्त्वाचा भाग असतोच. विद्यार्थ्याकडून अनेक नवीन कल्पना व प्रकल्प अभ्यासक्रमाचा भाग म्हणून केले जातात. मात्र बऱ्याच वेळा त्यांचा उपयोग शैक्षणिक पूर्ततेच्या पलीकडे जात नाही.प्रकल्प अहवाल व सादरीकरण या पलिकडे हे संशोधन पोहचत नाही. समाजाच्या गरजांवर आधारित नाविन्यपूर्ण संशोधन विद्यापीठामध्ये व्हावे हा या DICचा उद्देश आहे.

‘DIC’ची कार्यपद्धती

संपादन

डिझाईन करणे ही एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी उपभोक्ता (वस्तू वापरणारा) असतो. विद्यार्थ्यांनी लोकांकडून गरजा समजून घेणे, त्यांच्या अनुभवातून शिकणे, त्या माहितीच्या आधारे गरजा नक्की करून ठोस डिझाईन उद्दिष्टे ठेवणे. मग कल्पना विस्फोटासारख्या (Brain Storming) सारख्या साधनांचा वापर करून नवीन उत्तरे शोधणे, शोधलेली उत्तरे विविध साधनांचा (उदा. 3D प्रिंटर, फॅबलॅब)वापर करून प्रत्यक्षात आणणे अपेक्षित असते. शेवटचा टप्पा म्हणजे बनवलेली वस्तू/प्रक्रिया ही प्रत्यक्ष वापर करून त्यावर उपभोक्त्याच्या प्रतिक्रिया घेणे हे होय.[]

डिझाईनची ही प्रक्रिया केवळ यंत्रे किंवा वस्तू निर्मितीपुरती मर्यादित नसून सर्वच क्षेत्रात लागू आहे. पुणे विद्यापीठ पर्यावरण व जल व्यवस्थापन, पिक वाढीच्या आधुनिक पद्धती, संगणकीय डिझाईन, इलेक्ट्रॉनिक्स सेन्सर, औषध निर्मिती या विषयात डिझाईनचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करत आहे. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश पात्रता ही अतिशय लवचिक असून वरील क्षेत्रातील समस्यांवर उत्तर शोधणारे प्रकल्प करण्याची आवड व इच्छाशक्ती ही मुख्य पात्रता आहे. या अभ्यासक्रमाचे स्वरूप हे आंतरशाखीय (Interdisciplinary )असून इतर विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे अभ्यासक्रम करता येणार आहे.

विद्यार्थ्यांना सुरुवातीपासून प्रकल्पावर काम करत डिझाईनची सर्व तत्त्वे शिकायची आहेत. सैद्धांतिक भाग हा प्रकल्पाला पूरक असणार असून इंटरनेट, व्हिडीओ इ., माध्यमातून नेहमीच्या प्रचलित महाविद्यालयीन अभ्यासक्रमापेक्षा हा अभ्यासक्रम वेगळा असणार आहे. एखाद्या गावाच्या पाण्याचे ऑडीट करणे, नवीन पद्धतीने पिक घेणे, कचरा व्यवस्थापनाची नवीन कल्पना राबवणे, बचत गटांच्या उत्पादनांचे विविध डिझाईन करून देणे, विविध प्रक्रिया स्वयंचलित करणे, कारागिरांचे श्रम कमी करणे इ. विविध प्रकारचे प्रकल्प राबवून अनुभवातून शिकण्याची ही संधी असणार आहे.

या सर्व कोर्सेसला ३० श्रेयांक (CREDITS) आहेत व राष्ट्रीय कौशल्य आराखड्या (National Skill पात्रता Framework- NSQF) प्रमाणे Level-5 म्हणून मान्यता मिळाली आहे. हे सर्व प्रकल्प करताना व नवीन डिझाईन विकसित करताना उद्योगातील अभियंते व उद्योजगांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा अनुभव विद्यार्थ्याला मिळणार आहे.[]

DIC मधील सुविधा

संपादन

पुणे विद्यापीठ , विज्ञान आश्रम पाबळ तसेच नासिक व अहमदनगर येथील विद्यापीठाची उपकेंद्रे या ठिकाणी मुलभूत कार्यशाळा व प्रकल्प करण्यासाठीच्या अत्याधुनिक सुविधा असणार आहे. नवीन कल्पनेवर काम कारु इच्छिणा-या कोणालाही या सेवा वापरता येतील व आपल्या कल्पनेला मूर्त रूप देता येणार आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी त्यांच्या शैक्षणिक प्रकल्पांना प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी DICतील सुविधांचा लाभ घेऊ शकतील.

संदर्भ

संपादन
  1. ^ "Vigyan Ashram". vigyanashram.com (इंग्रजी भाषेत). 2018-08-19 रोजी पाहिले.
  2. ^ "Vigyan Ashram". vigyanashram.com (इंग्रजी भाषेत). 2018-08-19 रोजी पाहिले.
  3. ^ "Ministry of Skill Development And Entrepreneurship". www.msde.gov.in (इंग्रजी भाषेत). 2018-07-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-08-19 रोजी पाहिले.