ठाकूरदास बंग
गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक
ठाकूरदास बंग (इ.स. १९१७- इ.स. २०१३) हे गांधीविचारांवरील सच्ची निष्ठा जपणाऱ्या निवडक नेत्यांमध्ये गणना होणारे एक समाजसेवी होते. ते सर्वोदय चळवळीत सुरुवातीपासून सहभागी होते. गांधीजींच्या ' चले जाव ' चळवळीत ते सामील होते. समाजसेवक अभय बंग यांचे ते वडील होय. जमनालाल बजाज स्मृती पुरस्कार, अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कारासह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते.