टेबल बे
दक्षिण आफ्रिकेच्या केप टाउन शहराजवळील आखआत
टेबल बे (आफ्रिकान्स:टाफेलबाई) हा आफ्रिकेच्या नैऋत्य टोकाशी असलेला अटलांटिक महासागरावरील आखात आहे. या आखाताच्या किनाऱ्यावर केप टाउन शहर वसलेले आहे. येथून जवळ टेबल माउंटन हा पर्वत आहे. अनेक शतके हा आखात केप टाउनशी समुद्रीमार्गे व्यापार करण्यास वापरला जात आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या केप टाउन शहराजवळील आखआत | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | खाडी | ||
---|---|---|---|
स्थान | दक्षिण आफ्रिका | ||
| |||
बार्तोलोम्यू दियास हा टेबल बे येथे पोचणारा पहिला युरोपीय खलाशी होता. या आखातातील रॉबेन आयलंड या बेटावर दक्षिण आफ्रिकेच्या वर्णद्वेशी सरकारने नेल्सन मंडेलांना वीस पेक्षा जास्त वर्षे कैदेत ठेवले होते.