टीजीव्ही

फ्रान्सची द्रुतगती रेल्वे सेवा
(टी.जी.व्ही. या पानावरून पुनर्निर्देशित)

टीजीव्ही (फ्रेंच: Train à Grande Vitesse, अर्थ: दृतगती रेल्वे) ही फ्रान्स देशामधील दृतगती रेल्वे सेवा आहे. एस.एन.सी.एफ. ही फ्रान्सची राष्ट्रीय रेल्वे कंपनी टीजीव्ही रेल्वेगाड्या चालवते.

पॅरिसच्या एका रेल्वे स्थानकात उभी असलेली टीजीव्ही

१९७० च्या दशकात आल्स्टॉम ह्या फ्रेंच कंपनीने टीजीव्ही प्रकल्पाचा विकास केला व २७ सप्टेंबर १९८१ रोजी पहिला टीजीव्ही रेल्वे पॅरिसल्योन शहरांदरम्यान धावली. उद्घाटनाच्या वेळी टीजीव्ही ही जगातील केवळ चौथी दृतगती रेल्वे होती. सध्या टीजीव्ही ही जगातील सर्वात वेगवान पारंपारिक (मॅग्लेव्हचा अपवाद वगळता) रेल्वे आहे. ३ एप्रिल २००७ रोजी टीजीव्हीने ५७४.८ किमी/तास (३५७.२ मैल/तास) इतक्या वेगाचा विक्रम नोंदवला.[१] आजवर टीजीव्हीने वेगाचे अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत.

टीजीव्हीने प्रस्थापित केलेले विक्रम

सुरुवातीला मिळालेल्या प्रचंड यश व लोकप्रियतेमुळे फ्रान्समध्ये विसाव्या शतकाच्या अखेरीस अनेक टीजीव्ही मार्ग चालू करण्यात आले. सध्या फ्रान्समध्ये १,८९७ किमी लांबीचे टीजीव्हीसाठी बनवण्यात आलेले विशेष लोहमार्ग अस्तित्वात असून ९ मार्गांवर टीजीव्ही सेवा कार्यरत आहे. अनेक टीजीव्ही मार्ग फ्रान्सला युरोपातील इतर देशांसोबत जोडतात, ज्यांमध्ये चॅनल टनेलमधून धावणाऱ्या व इंग्लंडला फ्रान्स व बेल्जियमसोबत जोडणाऱ्या युरोस्टार ह्या सेवेचा समावेश आहे.

संदर्भ

संपादन
  1. ^ "French Train Hits 357 mph Breaking World Speed Record". foxnews.com. 4 April 2007. 11 February 2010 रोजी पाहिले.

हे सुद्धा पहा

संपादन

चित्र दालन

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: