टिकली हा एक सौंदर्यालंकार आहे. हा अलंकार स्त्रिया आपल्या कपाळावर लावतात . टिकल्या अनेक आकाराच्या असतात. गोल,अंडाकार,चंद्रकोर या आकाराच्या असतात, त्याचप्रमाणे टिकल्या अनेक रंगाच्या असतात. कुंकू हे हिंदू स्त्रिया वापरत असलेला सौभाग्यालंकार आहे. सहसा विवाहित स्त्रिया कुंकू कपाळावर लावतात.

इतिहास संपादन

कथासरित्सागात वासवदत्ता व पद्मावती यांच्या कथेत टिकलीचा उल्लेख आहे.प्रसाधनासाठी झाडाच्या पानाचाही टीकल्या म्हणून उपयोग करीत असल्याचा उल्लेख आढळतात. यस्यामुपवनवीत्या तमालपत्राणि युवतिवदने च अर्थ – (वाराणसीतल्या) उपवनमार्गावरील तमालवृक्षांवर व युवतीच्या मुखांवर तमालपत्रे सोबत असत. टिकली लावण्याची पद्धत मुखत्वे उत्तर प्रदेश,राजस्थान व मारवाड या भागात आहे.दक्षिणेत टिकली फारशी प्रचारात नाही. कुमारी व सौभाग्यवती यांचाच हा अलंकार आहे.जबलपूर,बेतुल,रायपूर आणि सागर या जिल्ह्यातील लाखेरा आणि पटला जातीचे लोक टिकल्या तयार करण्याचा व्यवसाय करतात.[१]

स्वरूप संपादन

टीका (तिलक) या शब्दावरून हा लघुत्यदर्शक शब्द बनला आहे.टिकली गोल असते. क्वचितच ती ताराकृती,स्वस्तिकाकृती व अर्धचंद्राकृती अशीही करतात.तिचा खालचा भाग गुलालाचा किवा कुंकवाचा असतो.आणि वरचा भाग भिंगाचा किवा अभ्रकाचा असतो.

संदर्भ संपादन

  1. ^ भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा