टाटा उद्योगसमूह
टाटा उद्योगसमूह हा बहुराष्ट्रीय कंपन्यांचा मुंबईत मुख्यालय असलेला भारतीय उद्योगसमूह आहे. हा भारतातल्या सर्वात मोठ्या खाजगी उद्योगसमूहांपैकी एक आहे. बाजार भांडवल आणि महसुलाचा विचार करता भारतातील हा आघाडीचा समूह आहे. रसायने, पोलाद, वाहननिर्मिती, माहिती तंत्रज्ञान, दूरसंपर्क, ऊर्जा, चहा आणि आतिथ्य या क्षेत्रांत या समूहातील कंपन्या प्रामुख्याने आघाडीवर आहेत. सहा खंडांतील ८०हून अधिक देशांत टाटा समूहाचे कामकाज विस्तारले आहे.
उद्योगसमूहाचा इतिहास संपादन करा
टाटा समूहाची सुरुवात १८६८ मध्ये झाली. भारतावर ब्रिटिश राजवट असताना जमशेटजी नसरवानजी टाटा यांनी हिंदुस्थानात कापसाचे व्यवहार करणारी कंपनी स्थापन केली. त्यानंतर नागपूरमध्ये १८७७ मध्ये एम्प्रेस मिल्स स्थापन झाली. टाटा समूहाने मुंबईत १९०३ मध्ये ताजमहाल हॉटेल सुरू केले. १९०४ मध्ये जमशेटजींच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र 'दोराबजी टाटा' समूहाचे चेअरमन झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली समुहाने पोलादनिर्मिती आणि जल विद्युतनिर्मिती प्रकल्प सुरू केले. सर दोराबजी टाटा यांच्या मृत्यूनंतर १९३४ मध्ये नवरोजी सकलातवाला यांनी पुढची सुमारे चार वर्षे समूहाची धुरा वाहिली. १९३८ मध्ये जहांगीर रतनजी दादाभाई अर्थात जे.आर.डी. टाटा हे या समूहाचे चेअरमन झाले. त्यांनी समूहाचा विस्तार मोठ्या प्रमाणात केला. टाटा केमिकल्स, टेल्को (आता टाटा मोटर्स), टाटा इंडस्ट्रीज, टाटा टी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि टायटन इंडस्ट्रीज ही या काळात सुरू झालेल्या काही महत्त्वाच्या कंपन्यांची नावे होत. रतन टाटा यांनी जेआरडींकडून १९९१ मध्ये सूत्रे स्वीकारली. २०१२ साली त्यांनी रतन टाटा यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. २०१६ मध्ये सायरस मिस्त्री टाटा समूहातून बाहेर पडले. २०१७ पासून नटराजन चंद्रशेखरन यांनी चेअरमनपदाची सूत्रे स्वीकारली आहेत.
टाटा उद्योगसमूहाच्या अध्यक्षांची सूची संपादन करा
- जमशेदजी टाटा (१८८७-१९०४)
- सर दोराबजीटाटा (१९०४-१९३२)
- नवरोजी सकलातवाला (१९३२-१९३८)
- जे. आर. डी. टाटा (१९३८-१९९१)
- रतन टाटा (१९९१-२०१२)
- सायरस मिस्त्री (२०१२-२०१६)[१]
- रतन टाटा (२०१६-२०१७)
- नटराजन चंद्रशेखरन (२०१७ - ते आजागायत)
टाटा उद्योगसमूहाचे लोकोपकारी कार्य संपादन करा
टाटा उद्योगसमूहाने विविध संशोधन, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या उभारणीमध्ये आर्थिक योगदान दिले आहे. उद्योग समूहाच्या लोकोपकारी कार्याची दाखल घेऊन २००७ साली समूहाला कार्नेज पदकाने गौरविण्यात आले. टाटा उद्योग समूहाने स्थापन केलेल्या काही संस्थांची सूची :-
- टाटा मूलभूत संशोधन संस्था
- भारतीय विज्ञान संस्था
- टाटा व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र
- टाटा फुटबॉल अकादमी
- टाटा क्रिकेट अकादमी
- टाटा मेमोरिअल हॉस्पिटल
टाटा समूहाचा इतिहास सांगणारी पुस्तके संपादन करा
- कॉर्पोरेट आयडाॅल रतन टाटा (सुधीर सेवेकर)
- जमशेटजी टाटा (सुभाषचंद्र जाधव)
- जमशेदजी टाटा (हिंदी-मराठी, चित्रकथा-बालसाहित्य, लेखक - अनंत पै)
- टाटा एका कॉर्पोरेट ब्रॅंडची उत्क्रांती (मूळ इंग्रजी लेखक, मॉर्गन विट्झेल, मराठी अनुवाद - विदुला टोकेकर)
- टाटायन - एक पोलादी उद्यमगाथा (लेखक : गिरीश कुबेर)
- द टीसीएस स्टोरी ....ॲन्ड बियॉंड (मूळ इंग्रजी, लेखक एस.रामदुराई, मराठी अनुवाद ??)
संदर्भ संपादन करा
- ^ "Former chairmen". www.tata.com. Archived from the original on 2018-06-28. 15 जून 2018 रोजी पाहिले.