झींगा हे आखाड्यात वाजविले जाणारे एक घनवाद्य आहे. छडिया (सरळ) व कमानिया (वक्राकार) असे त्याचे दोन प्रकार आहेत. एका लाकडी चौकटीत लोखंडाच्या दोन कांबी, त्या कांबित लोखंडी किंवा पितळी चकत्या व दोन बाजूंना वाद्य धरण्यासाठी दोन कान अशी या वाद्याची रचना असते. चौकट हाताने वर-खाली करण्याने लेझिमीच्या आवाजासारखा याचा आवाज येतो. लाठी, गदगा, बनैती इत्यादी खेळांना याची साथ उत्साहवर्धक ठरते. याची माहिती अंबाप्रसाद सुमन यांच्या 'कृषक जीवनसंबंधी ब्रजभाषा शब्दावली' (१९६०) या ग्रंथात