झरिना स्क्रूवाला

(झरिना मेहता या पानावरून पुनर्निर्देशित)

झरिना स्क्रूवाला(जन्म १९६१) ह्या एक भारतीय उद्योजिका व स्वदेश फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत. स्वदेश फाउंडेशन हे भारतातील ग्रामीण भाग सक्षमीकरण करण्याचे काम करते. झरिना स्क्रूवाला ह्या पूर्वी यूटीव्ही सॉफ्टवेर कम्युनिकेशनचा मुख्य क्रिएटिव्ह ऑफिसर होत्या. जिथे त्यांनी यूटीव्ही बिंदसास, यूटीव्ही प्लस, यूटीव्ही ॲक्शन आणि हंगमा टीव्ही चॅनेल्सची संकल्पना, प्रमोशन आणि व्यवस्थापनची जबाबदारी सांभाळली.[]

झरिना स्क्रूवाला
जन्म झरिना मेहता
१९६१
अमेरिका, वॉशिंग्टन
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण जे. बी. पेटिट मुलींची शाळा, सेंट जेवियर्स कॉलेज
ख्याती भारतीय उद्योजिका
धर्म हिंदू
जोडीदार रॉनी स्क्रूवाला

सुरुवातीचे जीवन

संपादन

झरीना यांचा जन्म अमेरिकातील वॉशिंग्टन येथे झाला, वयाचा ८ व्या वर्षी त्यांचे कुटुंबीय भारतात स्थायिक झाले. तिने जे. बी. पेटिट मुलींची शाळा या मधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले, आणि अर्थशास्त्रामध्ये बी.ए. सेंट जेवियर्स कॉलेज मुंबई येथून पूर्ण केले. त्यानंतर तिने झेवियर कम्युनिकेशन्स इन्स्टिट्यूट मधून मार्केटिंग आणि जाहिरात यामध्ये मास्टर पदवी मिळवली.[]

कारकीर्द

संपादन

झरिना स्क्रूवाला यांनी आपल्या करिअरची सुरुवात पर्ल पदमसी थिएटर पासून प्रोडक्शन मॅनेजर म्हनून केली. पर्ल पदमसी थिएटर मध्ये काम करत असताना त्यांची भेट रॉनी स्क्रूवाला आणि देवेन खोटे यांचाशी झाली, त्यानंतर ते व्यावसायिक भागीदार झाले.

युनायटेड दूरचित्रवाणी (यूटीव्ही)

संपादन

झरिना यांनी १९९० मध्ये रॉनी स्क्रूवाला आणि देवेन खोटे यांचा सोबत यूटीव्हीची स्थापना केली. सुरुवातीचा काळामध्ये त्यांचा कंपनीने फक्त जाहिरातीवर लक्ष केंद्रित केले, त्यानंतर त्यांची स्वतःचे स्वतंत्र प्रोडक्शन सुरू केले. यूटीव्हीने सर्वप्रथम दूरदर्शनसाठी एक प्रश्नमंजुषा कार्यक्रम तयार केला. या कार्यक्रमाचे नाव 'मशूर महल' असे होते, व झरिना या कार्यक्रमाच्या सहायक संचालक होत्या. झरिना, रॉनी स्क्रूवाला आणि देवेन खोटे यांनी देशातील पहिला रिॲलिटी कार्यक्रम साप-सीडी (१९९२) मध्ये तयार केला. त्यानंतर त्यांनी पहिला दैनंदिन कार्यक्रम ऑपेरा शांती (१९९४) मध्ये निर्माण केला. ऑपेरा शांतीचा यशानंतर झरिना यांनी विविध कार्यक्रमांची निर्मिती चालू केली, त्यामध्ये साया, साप सीडी, हिप हिप हुर्ये आणि शाका लका बूम बूम या कार्यक्रमांची निर्मिती केली.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Zarina Screwvala Birthday, Biography, Age, Family & Wiki". www.celebrityborn.com (इंग्रजी भाषेत). 2018-01-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-08-01 रोजी पाहिले.
  2. ^ Raghavendra, Nandini (2014-04-04). "Charity auction for Zarine Screwvala's Swades foundation offers a date with Ranbir". The Economic Times. 2018-08-01 रोजी पाहिले.