ज्ञानोदय हे अहमदनगर येथून प्रकाशित होणारे वृत्तपत्र आहे. हे वृत्तपत्र १८४३ साली सुरू झाले. अमेरिकन मराठी मिशनने याची सुरुवात केली. ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणे हा याचा मुख्य उदेश होता. हे वृतपत्र आजही सुरू आहे.

इतिहास

संपादन

ज्ञानोदयाची सुरुवात मासिक या स्वरूपात झाली. अहमदनगर येथून याचा पहिला अंक १८४२मध्ये निघाला. त्यानंतर पुढील वर्षी १८४३ मध्ये याचे पाक्षिकात रूपांतर झाले. यानंतर जुलै १८७३ पासून हे साप्ताहिक झाले. ज्ञानोदयाचे पहिले सहा अंक मराठीत प्रसिद्ध झाले होते. या नंतर मात्र ते मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत निघू लागले.

बऱ्याच नियतकालिकांमध्ये धर्मासंबधी वाद व ख्रिस्ती धर्मावर टीका होत होती. त्या टीकेला उत्तर देण्यासाठी एक प्रभावी साधन म्हणून नियतकालिक म्हणून ज्ञानोदयाची सुरुवात झाली.

संपादक मंडळ

संपादन
  1. हेन्री व्हेलेंटाईन
  2. एबट
  3. ह्युम
  4. फेअरबँक
  5. शाहू दाजी कुकडे
  6. तुकाराम नथुजी
  7. नारायण वामन टिळक
  8. देवदत टिळक
  9. दि.शं.सावरकर
  10. मनोहर कृष्ण उजगरे
  11. डॉ.भा.पां.हिवाळे
  12. शां.ल.साळवी
  13. र.ह.केळकर
  14. सुमंत दयानंद करंदीकर

वैशिष्ट्ये

संपादन

मराठी वृत्तपत्रात चित्रे छापण्याची सुरुवात ज्ञानोदयने केली.

लहान मुलांसाठी 'बालबोधमेवा' ही विशेष पुरवणी सुरू करून ज्ञानोदय वृत्तपत्राने एका विशेष उपक्रमाची सुरुवात केली.

या वर्तमान पत्रात रेल्वेला चांग्याम्हासोबा म्हणले होते,म्हणजे चाक असलेली म्हैस म्हणले होते.