हरिपाठ
(ज्ञानेश्वर हरीपाठ या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख ज्ञानकोशीय परिच्छेद लेखनापुरता मर्यागित आहे. हरिपाठांचे आणि इतरही कॉपीराईट फ्री मूळ लेखन हे मराठी विकिस्रोत या बंधुप्रकल्पात जतन केले जाते. ज्यांना मूळ ग्रंथांचे स्रोत बघायचे असतील, लेखन- वाचन करावयाचे आहे त्यांना मराठी विकिस्रोत प्रकल्पात s:हरिपाठ येथे करता येईल.
हरिपाठ म्हणजे नेहमी ईश्वराचे नामस्मरण करण्यासाठी केलेली अभंग रचना होय. वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाला महत्त्वाचे स्थान आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव आणि संत निवृत्तीनाथ यांनी हरिपाठाचे अभंग रचलेले आहेत. यामध्ये मुख्यत्वे संत ज्ञानेश्वर महाराज कृत हरिपाठाचे अभंग जास्त गायले जातात.
हरिपाठाचा शब्दशः अर्थ हरीचा पाठ, हरीचे नामस्मरण पण तार्किकदृष्ट्या विचार केला तर हरिपाठ म्हणजे हरीला (विठ्ठलाला) प्राप्त करून देणारे तत्त्वज्ञान.
हरिपाठासंबंधी अन्य पुस्तके
संपादन- हरिपाठ - एक आनंदवाट (हरिपाठाचे विवेवन; लेखिका : डॉ. लता पाडेकर)
- हरि मुखे म्हणा (हरिपाठाचे विवेवन; लेखिका : कौसल्या गोरे)
- श्रीज्ञानेश्वरकृत हरिपाठावर श्री अण्णा घाणेकर यांचे रसाळ निरूपण
- सार्थ श्री पंचरत्न हरिपाठ (लेखक विठ्ठल जि. नाडकर्णी)
- ज्ञानेश्वरी विशेष चिंतन - हरिपाठ एक आव्हानात्मक सूत्र ग्रंथ (लेखक : न्यायाचार्य श्री. नामदेव महाराज शास्त्री)