जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले पुतळे (छत्रपती संभाजीनगर)

औरंगाबाद मधील औरंगपुरा भागात महात्मा जोतीराव फुलेसावित्रीबाई फुले यांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. शिल्पकार निरंजन एस. मडिलगेकर यांनी हा पुतळा तयार केला आहे. औरंगाबाद महापालिकेने हे पुतळे उभारले असून, त्याचे अनावरण मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी १७ सप्टेंबर २०१९ रोजी अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची उपस्थिती होती. फुले दांपत्याचा पुतळा उभारण्याची मागणी इ.स. २००० पासून सुरू होती. त्यासाठी वारंवार आंदोलने करावी लागली. वीस वर्षे पुतळ्याचे काम प्रलंबित होते. शहरातील मध्यभागी असलेल्या औरंगपुऱ्यात गेल्या अनेक वर्षांपासून महात्मा ज्योतीबा फुले यांचा (जूना) पुतळा होता. फुले दांपत्याचा एकत्र पुतळा असलेले औरंगाबाद हे एकमेव शहर असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले होते.[१][२][३]

औरंगपुरा, औरंगाबाद येथील फुले दांपत्यांचे (जोतीराव फुलेसावित्रीबाई फुले) पुतळे

चित्रदालन संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "मुख्यमंत्र्यांच्या एका फोनमुळे उभारला फुले दांपत्याचा पुतळा -अतुल सावे". 17 सप्टें, 2019. Archived from the original on 2020-03-27. 2020-03-27 रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2020-03-27. 2020-03-27 रोजी पाहिले.
  3. ^ "मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन आला आणि ..." www.sarkarnama.in.

बाह्य दुवे संपादन