जॉर्ज ऑर्वेल

(जॉर्ज ओरवेल या पानावरून पुनर्निर्देशित)

एरिक आर्थर ब्लेअर (इंग्लिश: Eric Arthur Blair), ऊर्फ जॉर्ज ऑर्वेल (इंग्लिश: George Orwell), (जून २५, इ.स. १९०३; मोतिहारी, बिहार, ब्रिटिश भारत - जानेवारी २१, इ.स. १९५०; लंडन, युनायटेड किंग्डम) हा इंग्लिश लेखक व पत्रकार होता. तीव्र बुद्धिमत्ता, चतुराई, सामाजिक विषमतेची सखोल जाण, एकाधिकारशाहीला कडवा विरोध, भाषेची सुस्पष्टता आणि लोकशाहीशी संलग्न असलेल्या समाजावादावरचा विश्वास इत्यादी वैशिष्ट्ये त्याच्या लेखनात आढळून येतात.

एरिक आर्थर ब्लेअर
(जॉर्ज ऑर्वेल)
जन्म नाव एरिक आर्थर ब्लेअर
टोपणनाव जॉर्ज ऑर्वेल, जॉन फ्रीमन
जन्म जून २५, इ.स. १९०३
मोतिहारी, बिहार, ब्रिटिश भारत
मृत्यू जानेवारी २१, इ.स. १९५०
कॅम्डेन, लंडन, इंग्लंड
राष्ट्रीयत्व ब्रिटिश
कार्यक्षेत्र साहित्य, पत्रकारिता
भाषा इंग्लिश
साहित्य प्रकार कादंबरी
प्रसिद्ध साहित्यकृती अ‍ॅनिमल फार्म, होमेज टू कातालुन्या
वडील रिचर्ड वॅम्सली ब्लेअर
आई इडा मेबल ब्लेअर
पत्नी आयलीन ओ'शॉनेसी, सोनिया ब्राउनेल

ऑर्वेलने लेखनात कल्पनाधारित, तत्त्वनिष्ठ पत्रकारिता, साहित्यिक समीक्षा आणि काव्य असे नाना लेखनप्रकार हाताळले. त्याची नाइंटीन एटी-फोर (इ.स. १९४९ साली प्रकाशित) ही कादंबरी आणि उपहासात्मक लघुकादंबरी अ‍ॅनिमल फार्म (इ.स. १९४५ साली प्रकाशित) ह्या विख्यात साहित्यकृती आहेत. विसाव्या शतकात ह्या दोन पुस्तकांनी खपाचा उच्चांक गाठला होता. स्पॅनिश यादवी युद्धकाळात रिपब्लिकनांच्या बाजूने स्वयंसेवक म्हणून काम करताना आलेल्या अनुभवांवर त्याने होमेज टू कातालुन्या (इ.स. १९३८ साली प्रकाशित) हे पुस्तक लिहिले. त्याचे राजकारण, साहित्य, भाषा आणि संस्कृती या विषयांवरील अनेक निबंधही नावाजले गेले आहेत.

आधुनिक संस्कृती, राजकारणावरचा ऑर्वेलचा पगडा अद्यापही अबाधित आहे. त्याने भाषेला बहाल केलेल्या अनेक नवीन संज्ञांबरोबरच ऑर्वेलियन ही संज्ञा शब्दकोशांत समाविष्ट झालेली आहे.

बाह्य दुवे संपादन