जॉईस हिल्डा बंडा (इंग्लिश: Joyce Hilda Banda; १२ एप्रिल १९५०) ही आफ्रिकेतील मलावी देशाची भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे. मागील राष्ट्राध्यक्ष बिंगू वा मुथारिका ह्याच्या सरकारात उप-राष्ट्राध्यक्षपदी असणाऱी बंडा एप्रिल २०१२ मधील मुथारिकाच्या अकस्मात मृत्यूनंतर राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाली. ती मलावीची चौथी राष्ट्रप्रमुख व पहिलीच महिला राष्ट्रप्रमुख आहे.

जॉईस बंडा

मलावीची चौथी राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
७ एप्रिल २०१२ – ३१ मे २०१४
मागील बिंगू वा मुथारिका
पुढील पीटर मुथारिका

मलावीची उप-राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२९ मे २००९ – ७ एप्रिल २०१२
राष्ट्राध्यक्ष बिंगू वा मुथारिका

जन्म १२ एप्रिल, १९५० (1950-04-12) (वय: ७४)
मलेमिया, न्यासालॅंड

२०१२ साली फोर्ब्ज मासिकाने बंडाचा जगातील ७१व्या क्रमांकाची महिला तर आफ्रिकेमधील सर्वात बलाढ्य महिला असा उल्लेख केला होता. सुमारे २ वर्षे राष्ट्राध्यक्षपदावर राहिल्यानंतर मे २०१४ मधील अध्यक्षीय निवडणुकीमध्ये ती पीटर मुथारिकाकडून पराभूत झाली.

बाह्य दुवे संपादन