जेनेसी नदी
जेनेसी नदी अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया आणि न्यू यॉर्क राज्यांतून वाहणारी नदी आहे. ही नदी पेनसिल्व्हेनियाच्या युलिसिस टाउनशिप गावाजवळ उगम पावते व उत्तरेकडे वाहत ऑन्टॅरियो सरोवरास मिळते. १५७ मैल लांबीची ही नदी अंदाजे २,००० फूट खाली वाहते.
ही नदी अमेरिकतील दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहणाऱ्या मोजक्या नद्यांपैकी एक आहे.
जेनेसीवर माउंट मॉरिस डॅम हे मोठे धरण आहे. एकोणिसाव्या शतकात या नदीवर अनेक पाणचक्क्या बांधलेल्या होत्या व त्याद्वारे येथील धान्य दळण्याच्या गिरण्या चालत असत. आजही रॉचेस्टर शहराच्या मध्यवर्ती भागाला या नदीवरील बांधापासून जलविद्युत पुरवठा होतो.