जेटब्लू
जेटब्ल्यू (JetBlue Airways Corporation) ही कमी दरात विमानसेवा पुरवणारी एक अमेरिकन विमान वाहतूक कंपनी आहे. १९९८ साली स्थापन झालेली जेटब्ल्यू अमेरिकेच्या अनेक शहरांसह कॅरिबियन, मध्य अमेरिका इत्यादी देशांमधील शहरांना देखील प्रवासी विमानसेवा पुरवते. न्यू यॉर्क शहराच्या क्वीन्स भागात जेटब्ल्यूचे मुख्यालय असून जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा तिचा प्रमुख तळ आहे.
![]() | ||||
| ||||
स्थापना | ऑगस्ट १९९८ | |||
---|---|---|---|---|
हब | जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ (न्यू यॉर्क शहर) | |||
मुख्य शहरे |
फोर्ट लॉडरडेल लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ लॉंग बीच सान हुआन ऑरलॅंडो | |||
फ्रिक्वेंट फ्लायर | ट्रूब्ल्यू | |||
विमान संख्या | २०७ | |||
गंतव्यस्थाने | ८७ | |||
ब्रीदवाक्य | You Above All | |||
पालक कंपनी |
जेटब्ल्यू एरवेझ कॉर्पोरेशन लुफ्तान्सा समूह (१५.८५%) | |||
मुख्यालय | क्वीन्स, न्यू यॉर्क | |||
संकेतस्थळ | https://www.jetblue.com/ |
जेटब्ल्यू अमेरिका, मेक्सिको, पेरू, पोर्तो रिको, बहामास, बर्म्युडा, बार्बाडोस, कोलंबिया, कॉस्टा रिका, डॉमिनिकन प्रजासत्ताक, ग्रेनेडा, जमैका, मेक्सिको, त्रिनिदाद आणि टोबॅगो सह ९७ ठिकाणि विमानसेवा पुरवते.
जेट ब्लू एरवेझ कॉर्पोरेशन किंवा जेट ब्लू ही एक अमेरिकन विमान कंपनी आहे जी अमेरिकेतील सहाव्या क्रमांकाची सगळ्यात मोठी विमानकंपनी आहे. तसेच त्यांचे कॉटनवूड हाइटस, उताह येथे सुद्धा कॉर्पोरेट ऑफिस आहे.[१]
मार्च २०१६ च्या आकडेवारीनुसार जेट-ब्लूच्या अमेरिका, मेक्सिको, करेबिअन, सेन्ट्रल अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेमध्ये १०० ठिकाणी सेवा आहेत.
इतिहास
संपादनजेटब्लूची स्थापना डेव्हिड नीलमनने ऑगस्ट १९९८ मध्ये केली.[२] फेब्रुवारी १९९९ मध्ये या कंपनीने “न्यू एर” या नावाखाली विमानवाहतूक कंपनी रचली.[३] जेटब्लूने साउथवेस्ट एरलाइन्सचे अनुकरण करून सुरुवातील दर कमी ठेवले पण विमानातील प्रत्येक आसनात दूरचित्रवाणी आणि उपग्रह रेडियोची सुविधा देऊन आपले वेगळेपण जपले. नीलमनच्या म्हणण्यानुसार “विमान प्रवासात मानवता परत आणणे” हेच जेटब्लूचे उद्दिष्ट आहे.
सप्टेंबर १९९९ मध्ये कंपनीला जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन ७५ उड्डाणे करण्याची मुभा मिळाली. फेब्रुवारी २००० मध्ये त्यांना अमेरिकेच्या सरकारकडून औपचारिक परवानगी मिळाली. ११ फेब्रुवारी, २००० रोजी बफेलो आणि फोर्ट लॉडरडेल रोजी जेटब्लूचे पहिले प्रवासी उड्डाण झाले.
जेटब्लूच्या स्थापकांना त्यांची नवीन विमानकंपनी प्रवाशांसाठी टॅक्सी सेवा असावी असे वाटत होते. तसेच न्यू यॉर्कशी असलेला त्यांचा संबंध दाखविण्यासाठी त्यांनी सुरुवातीला जेटब्लूच्या विमानांना न्यू यॉर्क शहरातील टॅक्सीप्रमाणे पिवळा रंग देण्याचे ठरवले होते परंतु नंतर त्यांनी विचार बदलला.[४]
११ सप्टेंबर २००१ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेतील बव्हंश विमानकंपन्या डबघाईला आल्या होत्या तेव्हासुद्धा जेटब्लूने त्या मंदीतही नफा कमविला होता.[५]
प्रस्थापित कंपन्यांनी जेटब्लूला टक्कर देण्यासाठी स्वतःच्या छोट्या छोट्या उपकंपन्या स्थापित केल्या -- डेल्टा एर लाइन्सने साँग तर युनायटेड एरलाइन्सने टेड या कंपन्या सुरू केल्या. काही काळाने साँग बंद करण्यात आली तर टेडला युनायटेड एरलाइन्सने स्वतःमध्ये विलीन करून घेतले.
ऑक्टोबर २००५ मध्ये इंधनाच्या किमती वाढल्याने कंपनीचा नफा ८१ लाख अमेरिकन डॉलर वरून २७ लाख डॉलर पर्यंत घसरला. इतर कंपन्यांशी असलेल्या स्पर्धेत मागे पडत असताना सुद्धा जेटब्लूने आणखी विस्तार करण्याचा निर्णय घेतला आणि अजून ३६ नवी विमाने विकत घेतली.[६] २००५ च्या शेवटच्या तिमाहीत कंपनीला पहिल्यांदाच तोटा झाला. तीन महिन्यातील ४ कोटी २२ लाख डॉलर तोट्यामुळे संपूर्ण वर्षाचे ताळमेळ तोट्यात गेले. हेच २००६मध्येही झाले.
डिसेंबर २००६ मध्ये कंपनीने त्यांच्या रिटर्न टू प्रॉफिट (आरटीपी) योजनेंतर्गत त्यांच्या ए३२० प्रकारच्या विमानातील आसनांची एक रांग काढून टाकली, ज्याने विमान ४१० किग्रॅने हलके झाले. त्याचबरोबर विमानातील कर्मचारी संख्या ४ वरून ३ केली. या योजनेमुळे कंपनीचा तोटा २००५मधील २ कोटी डॉलरवरून २००६मध्ये १० लाखांवर आला.
जेटब्लूने मे २०१० मध्ये साउथ आफ्रिकन एरवेझ, मार्च २०११ मध्ये व्हर्जिन अटलांटिक एरवेझ नोव्हेंबर २०११ मध्ये जेट एरवेझ आणि जून २०१२ मध्ये एर चायनाशी आंतरकंपनी करार केले.[७]
गंतव्यस्थाने
संपादनजानेवारी २०२४ च्या सुमारास जेटब्लू १०४ शहरांना विमानसेवा पुरवत होती. यांतील बव्हंश अमेरिका आणि कॅरिबियनमध्ये आहेत तर मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील निवडक शहरे आणि युरोपमधील चार शहरे आहेत.[८]
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "JetBlue's HQ contest down to NYC, Orlando".
- ^ "United States Securities and Exchange Commission".
- ^ "Our Company - History".
- ^ "The Steady, Strategic Ascent of JetBlue Airways".
- ^ "JetBlue, Exception Among Airlines, Is Likely to Post a Profit".
- ^ "Connectivity and Fleet Information - JetBlue Airways". 2016-04-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-04-04 रोजी पाहिले.
- ^ "JetBlue and Jet Airways to Partner on Interline Service to Brussels and Beyond to India".
- ^ "Route Map". New York: JetBlue Airways Corporation. August 22, 2020 रोजी पाहिले.