जॅरेल हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील छोटे गाव आहे. विल्यमसन काउंटीमधील हे शहर ऑस्टिनपासून ६२ किमी उत्तरेस आहे. २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९८४ आहे.

२६ मे, इ.स. १९९७ रोजी येथे आलेल्या एफ-५ टोरनॅडोमध्ये ७ व्यक्ती आणि ३००पेक्षा अधिक घोडे व गाई मृत्युमुखी पडल्या होत्या.