जीवाश्मशास्त्र' या शास्त्रात प्रागैतिहासिक जिवांची उत्पत्ती व पर्यावरणाशी जुळवून घेताना झालेली त्याची उत्क्रांती, यांचा प्रामुख्याने जीवाश्मांच्या मदतीने अभ्यास केला जातो. विद्याशाखीय दृष्टिकोनातून जीवाश्मशास्त्र ही जीवशास्त्रभूशास्त्र यांच्याशी संबंधित आंतरविद्या आहे. जीवाश्म विखुरलेले असतात. जीवाश्मांना एकत्रित करून कल्पनेच्या साहाय्याने प्राण्यांच्या शरीराचा आकार, खाद्यसवयी तसेच पुनरुत्पादन प्रक्रिया इत्यादी विविध प्रकारची माहिती संकलित करण्याचा प्रयत्न जीवाश्मशास्त्रज्ञ करीत असतात. या शास्त्राच्या अभ्यासामुळे, डायनॉसॉर जातीमधील अतिभव्य प्राणी पृथ्वीवरून नष्ट होण्याची कारणे कोणती याचा मागोवा घेण्यास खूप मदत झालेली आहे. आदिमानव कसा उत्क्रांत होत गेला याचाही खुलासा करण्याचा प्रयत्‍न या शास्त्राने केला आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.