जीवन प्रमाण (इं:Jeevan Pramaan) हे एक सेवानिवृत्तांसाठी आधार वर आधारीत डिजिटल जीवन प्रमाणपत्र(हयातीचा दाखला) आहे. याचे विमोचन पंतप्रधान नरेंद्र मोदींद्वारे दि. १० नोव्हेंबर २०१४ला करण्यात आले.[][]

याचा लाभ सुमारे एक कोटी सेवानिवृत्तांना होईल अशी अपेक्षा आहे. याने सेवानिवृत्तांना, त्यांचे निवृत्तीवेतन सुरू राहण्यासाठी व ते खात्यात जमा होण्यासाठी, दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र(हयातीचा दाखला) देण्यापासून सुटका मिळेल.

हे प्रमाणपत्र भारत सरकारच्या ईलेक्ट्रॉनिक्स व आय टी विभागाने विकसित केले आहे. [][][][]

संदर्भ

संपादन
  1. ^ प्रधानमंत्र्यांद्वारे जीवन प्रमाण विमोचित - सेवानिवृत्तांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र
  2. ^ प्रधानमंत्र्यांनी सेवानिवृत्तांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्राचे विमोचन केले
  3. ^ "जीवन प्रमाण: प्रधानमंत्री मोदींनी सेवानिवृत्तांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्राचे विमोचन केले". 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-10-13 रोजी पाहिले.
  4. ^ जीवन प्रमाणद्वारे सेवानिवृत्तांना मोकळा श्वास घेणे शक्य होईल
  5. ^ प्रधानमंत्री मोदींनी सेवानिवृत्तांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्राचे विमोचन केले
  6. ^ प्रधानमंत्री मोदींद्वारे सेवानिवृत्तांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र विमोचित.