जिभलिकलम
जिभलिकलम (TONGUE GRAFTING) हा सुद्धा भेटकलमाचाच प्रकार आहे. या ठिकाणी खुंटफांदी व कलमफांदीत जिभलिच्या आकाराचा छेद घेतात म्हणून याला जिभलिकलम म्हणतात. भेटकलमामध्ये एकमेकांना जोडणारा वर्धिश्ंनू पेशीजालाचा एकच भाग असतो, तर जिभलिकलमामध्ये वर्धिश्ंनू पृष्ठभागाचे ३ भाग येतात. त्यामुळे संयोगाची शक्यता भेटकलमापेक्षा जास्त असते. तथापि ही पद्धत कलमे बांधणाऱ्या वाकबगार लोकामध्ये सुद्धा फारशी रूढ झाली नाही. कारण साध्या भेटकलमाच्या पद्धतीतसुद्धा जवळ जवळ १०० % कलमे यशस्वीपणे साधता येतात.