जाहीर निवेदन
काही कामांच्या बाबतीत एखादी कंपनी संस्था कार्यालय यांनी घेतलेले निर्णय सर्व सभासदांपर्यंत आणि काही वेळा सर्व जनतेपर्यंत पोहोचविणे आवश्यक असते. विशेषतः निवडणूका
खरेदी-विक्री मालाचा लिलाव नव्या योजनाबद्दलचे निर्णय माहिती जाहीर स्वरूपात प्रकट करणे, केवळ सोय म्हणून नव्हे, तर कायद्याच्या दृष्टीनेदेखील, आवश्यक असते. कार्यालयाचा पत्ता बदलला, फ़ोन नंबर बदलला, कार्यालयाच्या कामकाजाच्या पद्धती आणि वेळा यातील बदल. कंपनीचा प्रतिनिधी या नात्याने लोकांशी आर्थिक व्यवहार करणारी व्यक्ती नोकरी सोडून गेली. सुरू केले अभ्यासक्रम बदलले, नवे अभ्यासक्रम सुरू केले. अभ्यासक्रमासाठी प्रवेश. देशातील नागरिकांपर्यंत तातडीचा संदेश पोहोचविणे आवश्यक असते, अशा वेळी घोषणापत्रक किंवा जाहीर निवेदन प्रसिद्ध केले जाते. घोषणापत्रका पेक्षा जाहीर निवेदन हे नाव अधिक रुढ आहे. जाहीर निवेदन चक्रमुद्रित करून त्याच्या प्रती संबंधित व्यक्ती, वर्तमानपत्रे, दृश्यमाध्यमांकडे पाठविले जाते. किंवा कधी कधी जाहीर निवेदन करणारी व्यक्ती अशा माध्यमातून जनतेशी थेट संवाद साधत असते.
जाहीर निवेदनात काही गोष्टी आवश्यक असतात.
१] जाहीर निवेदना मसूदा २] जाहीर निवेदन करणारी जवाबदार व्यक्तीची स्वाक्षरी-दिनांक. ३] जाहीर निवेदन, स्पष्ट, अटी,शर्ती सहित असले पाहिजेत. ४] मजकूर थोडा काटेकोर काळजीपूर्क लिहिलेला असावा.