हे उपनिषद सामवेदाशी संबंधित आहे. याच्यात एकूण २३ मंत्र आहेत. या उपनिषदांमध्ये पिप्पलादपुत्र पैप्पलादी आणि भगवान जाबाली यांच्यामधील परमतत्त्वाविषयीची प्रश्नोत्तरे समाविष्ट आहेत. प्रमुख प्रश्न आहेत : तत्त्वे काय आहेत? जीव कोण आहे? पशू कोण आह? ईश कोण आहे आणि मोक्षप्राप्तीचा उपाय कोणता आहे? या सर्व प्रश्नांची क्रमशः उत्तरे जाबाली मुनींनी दिलेली आहेत. शेवटी उपनिषद्-प्रतिपादित ज्ञानाच्या श्रेष्ठत्वाचे वर्णन करून प्रश्नोत्तरे संपविलेली आहेत.