जाफराबादी म्हैस ही एक म्हशीची जात आहे. या जातीच्या म्हशी आकाराने आणि वजनाने सर्वांत मोठ्या असतात. शरीर लांब आणि शरीराची हाडे पूर्ण वाढलेली पण शरीराच्या मानाने मांसल भाग कमी असतो. शिंगे मुळात जाड आणि चपटी, मुळापासून पाठीमागे आणि खालच्या बाजूने वळलेली असतात. या जातीची म्हैस एका विताला १८०० ते २५०० लीटर दूध देते.

हे देखील पहा संपादन

संदर्भ संपादन

बाह्य दुवा संपादन