जागतिक सांस्कृतिक परिषद
जागतिक सांस्कृतिक परिषद ही एक आंतरराष्ट्रीय संस्था. जगातील लोकांमध्ये सांस्कृतिक मूल्ये, सद्भावना आणि परोपकार वाढविणे हा या संस्थेचे उद्दीष्ट आहे. १९८१ साली मेक्सिकोमध्ये याची स्थापन झाली. या संस्थेच्या वतीने मानवजातीच्या सांस्कृतिक संवर्धनासाठी उत्कृष्ट व सकारात्मक योगदान देणाऱ्यांसाठी वार्षिक अल्बर्ट आइनस्टाईन यांच्या नावाने जागतिक विज्ञान पुरस्कार, जोसे वास्कोन्कोलोस यांच्या नावाने जागतिक शैक्षणिक पुरस्कार तसेच लिओनार्डो दा विंची यांच्या नावाने उत्कृष्ट शास्त्रज्ञ, शिक्षक व कलाकारांना जागतिक कला पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. या परिषदेच्या संस्थापक सदस्यांमध्ये अनेक नोबेल पुरस्कार विजेते समाविष्ट होते.